आर्य वैश्य समाजातर्फे सुधीर मुनगंटीवार यांचा हृद्य सत्कार

By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:02+5:302015-02-10T00:56:02+5:30

Arya Vaishya Samaj's Sudhir Mungantiwar receives a heartfelt welcome | आर्य वैश्य समाजातर्फे सुधीर मुनगंटीवार यांचा हृद्य सत्कार

आर्य वैश्य समाजातर्फे सुधीर मुनगंटीवार यांचा हृद्य सत्कार

>फोटो आहे....
अभिनंदन सोहळा : आमदार व महापौरांचाही सत्कार
नागपूर : महाराष्ट्र आर्य वैश्य समाजातर्फे रविवारी बजाजनगर येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी सपना मुनगंटीवार यांच्यासह आ. समीर कुणावार, आ. मदन येरावार , चंद्रपूरच्या महापौर राखी कंचर्लावार आदींचा हृद्य सत्कार करण्यात आला.
प्रारंभी बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका संजीवनी भेलोंडे यांच्या जुन्या हिंदी गाण्यांचा सुमधूर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या मध्यंतरात श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्यनाटिका सादर करण्यात आली. त्यानंतर समाजदेवी माता कन्यका परमेश्वरी मातेची महाआरती सुधीर मुनगंटीवार यांनी सपत्नीक केली. समाजाचे अध्यक्ष गणेश चक्करवार यांच्याहस्ते मुनगंटीवार यांच्यासह चारही मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊ न सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील विविध संघटना व आघाड्यांतर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारप्रसंगी व्यासपीठावर फॅन्सी कल्पक आतषबाजी करण्यात आली. संचालन अजय गंपावार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीषा यमसनवार, सायली पत्तीवार, सुरेश तन्नीरवार, अजय तातावार, राहुल उपगन्लावार आदींनी परिश्रम घेतले.
(प्रतिनिधी)

Web Title: Arya Vaishya Samaj's Sudhir Mungantiwar receives a heartfelt welcome