अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर महिलेने शाई फेकली

By Admin | Updated: January 17, 2016 17:46 IST2016-01-17T17:15:22+5:302016-01-17T17:46:23+5:30

दिल्लीत एका कार्यक्रमात एका महिलेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर शाई फेकल्याची घटना घडली आहे.

Arvind Kejriwal's wife threw ink in | अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर महिलेने शाई फेकली

अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर महिलेने शाई फेकली

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १७ - दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये गाडयासाठीचा सम-विषम फॉर्म्युला यशस्वी ठरल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एका महिलेने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंगावर शाई फेकल्याची घटना घडली आहे. 
या महिलेने असे का केले ? अद्याप समजू शकलेले नाही. तिचे नाव भावना असल्याचे समजत असून, तिने पंजाबमधील आम आदमी सेनेची सदस्य असल्याचा दावा केला आहे. 
या घटनेमुळे केजरीवाल यांच्या सुरक्षाव्यवस्थेत असणा-या त्रुटी दिसून आल्या आहेत. ही महिला केजरीवाल बोलत असलेल्या मंचाजवळ गेली आणि तिने केजरीवाल यांच्या अंगावर शाई फेकली. या घटनेनंतर तिथे असणारे सुरक्षाजवान तात्काळ त्या महिलेच्या दिशेने धावले. त्यावेळी केजरीवाल त्या महिलेला सोडून द्या, जेव्हा दिल्लीत काही चांगले घडते त्यावेळी अशा घटना होतात असे सांगत होते. दिल्ली पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरु केली आहे. 
 प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीत गाडयांसाठी १५ दिवस राबवण्यात आलेला सम-विषम क्रमांकाचा फॉर्म्युला यशस्वी ठरल्याबद्दल आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यापूर्वीही केजरीवाल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. 

Web Title: Arvind Kejriwal's wife threw ink in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.