हजारेंच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत केजरीवालांचे मौन पुन्हा जंतरमंतर : विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा
By Admin | Updated: February 15, 2015 22:36 IST2015-02-15T22:36:38+5:302015-02-15T22:36:38+5:30
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने दिल्लीत मिळविलेल्या अभूतपूर्व यशानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे प्रथमच दिल्लीत आंदोलन करीत असून त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाष्य टाळले आहे.

हजारेंच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत केजरीवालांचे मौन पुन्हा जंतरमंतर : विविध शेतकरी संघटनांचा पाठिंबा
न ी दिल्ली : आम आदमी पार्टीने दिल्लीत मिळविलेल्या अभूतपूर्व यशानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे प्रथमच दिल्लीत आंदोलन करीत असून त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाष्य टाळले आहे.हजारे हे केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्याविरुद्ध जंतरमंतरवर २३ फेब्रुवारीपासून दोन दिवसांचे आंदोलन करणार आहेत. केजरीवालांनी त्याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली नसली तरी आपचे अन्य नेते कुमार विश्वास यांनी अण्णांनी भेटीची वेळ दिल्यास निश्चितच भेटणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे केजरीवाल यांनी मोदी सरकारने आणलेल्या या कायद्याविरुद्ध आवाज उठविला होता. अण्णांच्या आंदोलनात विविध शेतकरी संघटना आणि मेधा पाटकर यांच्यासह अनेक नेते सहभागी होत असल्याची माहिती हजारे यांच्या कार्यालयाने दिली आहे.----------------चलो दिल्ली अण्णा हजारे २३ फेब्रुवारी रोजी सकाळी दिल्लीत पोहोचत असून ते हरियाणातील पलवल येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होतील. त्यानंतर शेतकऱ्यांची रॅली दिल्लीला पोहोचेल.-----------------कोटआम्ही अण्णाजींच्या संघर्षाला समर्थन देतो. आम्ही त्यांचा आदर करतो. ते जो आदेश देतील त्याचे मी पालन करेन, तथापि त्यांचा संघर्ष राजकीय पक्षांना दूर ठेवणारा आहे. त्यांनी भेटीची वेळ दिल्यास निश्चितच त्यांची भेट घेईन. प्रत्येकाने त्यांच्या लढ्याला पाठिंबा द्यावा, अशी मी विनंती करीत आहे.- कुमार विश्वासआपचे नेते.--------------काय आहे भूसंपादन कायदा!सरकारने गेल्यावर्षी २९ डिसेंबर रोजी वटहुकूम जारी करीत भूसंपादन कायद्यात सुधारणा घडवून आणल्या आहेत. औद्योगिक कॉरिडॉर, पीपीपी प्रकल्प, ग्रामीण पायाभूत प्रकल्प, स्वस्त दरांतील घरे आणि संरक्षण या पाच क्षेत्रांसाठी शेतजमीन ताब्यात घेताना परवानगीची अट काढून टाकण्यात आली आहे.