शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
मध्यरात्री लपून झाडांची कत्तल केल्याप्रकरणी पाेलिसांकडून पुण्यातील गेरा बिल्डरवर गुन्हा
3
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
4
Exit Polls चा परिणाम : आज 'मोदी स्टॉक्स'मध्ये दिसू शकते तेजी, काय म्हणताहेत एक्सपर्ट्स? जाणून घ्या
5
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
6
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
7
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
8
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
9
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
10
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
11
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
12
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
13
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
14
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
15
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
16
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
17
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
18
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
19
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
20
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून पत्नी सुनीता यांनी वाचला केजरीवाल यांचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 6:34 AM

तुरुंगातून बाहेर येत आश्वासने पूर्ण करण्याचे व्यक्त केले मत

नवी दिल्ली : आपण लवकरच तुरुंगाबाहेर येऊन दिलेली आश्वासने पूर्ण करणार, असा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठविलेला संदेश त्यांच्या पत्नी सुनीता यांनी वाचून दाखविला. केजरीवाल ज्या खुर्चीत बसून संबोधित करतात, त्याच खुर्चीत बसून त्यांच्या पत्नींनी हा संदेश वाचला. मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

‘मी आजवर भरपूर संघर्ष केला आणि भविष्यातही मोठा संघर्ष करावा लागणार आहे. कोट्यवधी जनतेचे आशीर्वाद माझ्यासोबत असून, तीच माझी ताकद आहे, असे संदेशात त्यांनी म्हटले. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अटकेच्या कारवाईविरोधात केलेल्या याचिकेवर  दिल्ली उच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणीस नकार दिला. 

आता मुख्यमंत्री कोण? केजरीवाल तुरुंगात राहून सरकार चालवतील, असे ‘आप’च्या मंत्र्यांनी म्हटले पण त्यासाठी तुरुंग अधीक्षकांची परवानगी घ्यावी लागेल. मंंत्रिमंडळाची बैठक कशी घेणार हाही प्रश्न उपस्थित होत आहे. पत्नी सुनीता यांनी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतून संदेश वाचला, ते पाहता मुख्यमंत्रिपदाच्या त्या दावेदार असतील, अशी चर्चा आहे. त्या विधानसभा सदस्य नसल्या तरी त्या ६ महिने मुख्यमंत्री राहू शकतील. दिल्ली विधानसभेचा ११ महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवाल