भ्रष्टाचारप्रकरणी केजरीवालांच्या मुख्य सचिवांना अटक
By Admin | Updated: July 4, 2016 21:29 IST2016-07-04T21:25:23+5:302016-07-04T21:29:55+5:30
मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे मुख्य सचिव राजेंद्र कुमारांसह 5 जणांना सीबीआयनं अटक केली आहे.

भ्रष्टाचारप्रकरणी केजरीवालांच्या मुख्य सचिवांना अटक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4- मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे मुख्य सचिव राजेंद्र कुमारांसह 5 जणांना सीबीआयनं अटक केली आहे. कुमार यांच्यासह इतर अधिका-यांवर 50 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकारानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. आपच्या वाढत्या प्रभावामुळेच केंद्र सरकारला भीती वाटत असून, असे कट रचले जात असल्याची सिसोदियांनी टीका केली आहे. सीबीआयनं काही दिवसांपूर्वीच 5 अधिका-यांच्या कार्यालयावर छापे टाकले होते.
केजरीवालांच्या सचिवांवर अनेक कंपन्यांना आर्थिक फायदा मिळवून दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. राजेंद्र कुमार हे केजरीवाल टीममधील सहकारी आहेत. 1989च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असलेल्या कुमार यांची फेब्रुवारी महिन्यात मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती.