शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात न लढण्याचा अरविंद केजरीवाल यांचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 20:32 IST

लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून डावपेच आखण्यास सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्दे2014 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना वाराणसी येथे आव्हान दिले होतेपण आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात न लढण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी  घेतला आहेअरविंद केजरीवाल हे सध्या केवळ दिल्लीवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत

लखनौ - लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून डावपेच आखण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींना वाराणसी येथे आव्हान दिले होते. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात न लढण्याचा निर्णय अरविंद केजरीवाल यांनी  घेतला आहे. आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह यांनी ही माहिती दिली. मात्र आप वाराणसी येथून मोदींविरोधात तगडा उमेदवार देणार आहे, असेही सिंह यांनी सांगितले. अरविंद केजरीवाल यांच्या या निर्णयाबाबत माहिती देताना संजय सिंह यांनी सांगितले की, ''अरविंद केजरीवाल हे सध्या केवळ दिल्लीवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत.''  मात्र आप वाराणसी येथून मोदींविरोधात तगडा उमेदवार देणार आहे, असेही संजय सिंह यांनी सांगितले.  2013 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षीत यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव केला होता. त्यानंतर केजरीवाल यांनी पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले होते. मात्र तिथे त्यांचा पराभव झाला होता. पण त्या निवडणुकीत केजरीवाल दुसऱ्या स्थानावर राहिले होते.  दरम्यान, आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत मोजक्या ठिकाणीच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आप दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि चंदिगड येथील लोकसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील काही जागांवरही आम आदमी पक्ष आपले उमेदवार देणार आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण