सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणारे केजरीवाल पाकिस्तानात ठरले हिरो
By Admin | Updated: October 7, 2016 13:35 IST2016-10-07T13:30:03+5:302016-10-07T13:35:12+5:30
भारताने सर्जिकल स्ट्राईक केलाच नाही दावा करणा-या पाकिस्तानसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिरो ठरले आहेत

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणारे केजरीवाल पाकिस्तानात ठरले हिरो
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भारताने सर्जिकल स्ट्राईक केलाच नाही दावा करणा-या पाकिस्तानसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिरो ठरले आहेत. केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागून पाकिस्तानची बाजू मांडल्याचा दावा पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांसह सामान्य लोकही करत आहेत. त्यामुळेच की काय अरविंद केजरीवाल सध्या पाकिस्तानात हिरो ठरले आहेत. पाकिस्तानी ट्रॉलमध्ये तर केजरीवालांचा उदो उदो होत आहे.
ट्विटरवर केजरीवालांसाठी #PakStandsWithKejriwal हॅशटॅग बनवण्यात आले असून सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. एकीकडे पाकिस्तानमध्ये केजरीवालांचा उदो उदो होत असून भारतामध्ये मात्र केजरीवाल यांच्यावर टीका होत आहे. पाकिस्तानी ट्रॉलनी तर अरविंद केजरीवाल यांना डोक्यावर उचलून घेतलं आहे. काहींनी तर केजरीवाल पाकिस्तानातून निवडणूक लढले तर निवडूनही येतील असं म्हटलं आहे.
Stand with this courageous