शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

"देशातील जनतेने सांगावं की, तुम्हाला देशाचा आदर करणारा पंतप्रधान हवा आहे की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:15 IST

'मणिपूरमध्ये 4 हजार घरे जाळली, 60 हजार लोक बेघर झाले, 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, पण पंतप्रधान गप्प राहिले.'

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत आयोजित विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपच्या आमदारांना मणिपूरची चिंता नाही, म्हणूनच त्यांनी विधानसभेतून काढतापाय घेतला. मणिपूरच्या लोकांना काय वाटत असेल. मणिपूरच्या घटनेवर पंतप्रधान मौन बाळगून आहेत. पंतप्रधान मोदींनी किमान शांततेचे आवाहन करायला हवे होते, पण ते तेवढंही करत नाहीत, अशी टीका केजरीवालांनी केली.

केजरीवाल पुढे म्हणतात, मणिपूरमध्ये 4 हजार घरे जाळली गेली, 60 हजार लोक बेघर झाले, 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, साडेतीनशे धार्मिक स्थळे जाळली, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांमध्ये गोळीबार झाला, जगभर भारताची थू-थू झाली, पण भारताचे पंतप्रधान गप्प राहिले. महिलांवर अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला, तरीदेखील पंतप्रधान गप्प होते. मणिपूरचे मुख्यमंत्री सांगतात की, तिथे रोजच अशा घटना घडत आहेत, तरीदेकील पंतप्रधान शांत बसतात.

भाजपचे लोक जवाहरलाल नेहरूंना शिव्या देतात, पण निदान जवाहरलाल नेहरू चीनच्या डोळ्यात डोळे घालून लढले होते. मला देशातील जनतेला विचारायचे आहे की, तुम्हाला देशाचा आदर करणारा पंतप्रधान हवा आहे की व्यवसाय करणारा पंतप्रधान हवा आहे. हात धरुन मंदिरात नेल्याने डिप्लोमसी होत नाही, त्यासाठी डोळे दाखवावे लागतात. आज चीन आव्हान देत आहे, पण पंतप्रधान गप्प आहेत. 2020 मध्ये चीनने गलवानमध्ये भारतीय जमीन ताब्यात घेतली, पण पंतप्रधान गप्प आहेत, अशीही टीका त्यांनी यावेळी केली. 

विधानसभेत अदानीचा मुद्दा उपस्थित करत केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधानांनी किमान हिंडेनबर्ग अहवालाबाबत ट्विट करायला हवे होते. अदानी मुद्द्यावर मोदी गप्प आहेत. जनतेचा पैसा बुडाला, पण पंतप्रधान गप्प राहिले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांना देशातून देशातून पळवून लावण्यात आले. आरबीआयच्या माहितीनुसार, 16000 डिफॉल्टर आहेत, त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय कारवाई का करत नाहीत? लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांवर जीप चालवली, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प राहिले. हाथरसमध्ये दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाला, पण पंतप्रधान गप्प राहिले. हे दुबळे, अहंकारी आणि भ्रष्ट पंतप्रधान आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीManipur Violenceमणिपूर हिंसाचारdelhiदिल्लीBJPभाजपाAAPआप