अरविंद केजरीवाल नुसतं बोलतात, करत काहीच नाही - अण्णा हजारे

By Admin | Updated: April 26, 2017 14:47 IST2017-04-26T14:47:24+5:302017-04-26T14:47:24+5:30

अरविंद केजरीवाल यांच्या बोलण्यात आणि करण्यात फरक असल्याचं अण्णा हजारे बोलले आहेत

Arvind Kejriwal speaks, nothing is doing - Anna Hazare | अरविंद केजरीवाल नुसतं बोलतात, करत काहीच नाही - अण्णा हजारे

अरविंद केजरीवाल नुसतं बोलतात, करत काहीच नाही - अण्णा हजारे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - दिल्ली महापालिका निवडणुकीत झालेल्या आम आदमी पक्षाच्या पराभवावर बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. अरविंद केजरीवाल कृती करण्यात कमी पडल्याची टीका अण्णा हजारेंनी केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या बोलण्यात आणि करण्यात फरक असल्याचं अण्णा हजारे बोलले आहेत. 
 
याआधी काही दिवसांपुर्वी अण्णा हजारे यांनी सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्तेची नशा चढून बुद्धी पालटली आहे अशी बोचरी टीका करत सुनावलं होतं. सत्तेची नशा मिळवण्यासाठीच केजरीवालांसारखे जनतेला ‘अण्णा माझे गुरू आहेत,’असे सांगत होते, हे माझ्या आता लक्षात आले आहे. केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील शुंगलू समितीने भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने व केजरीवाल यांचे शुद्ध आचार, विचार संपून जीवन दागी बनले आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर कडक शब्दांत टीका केली होती.
 

Web Title: Arvind Kejriwal speaks, nothing is doing - Anna Hazare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.