शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांना थप्पड मारणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 12:29 IST

'रोड शो' दरम्यान जीपवर चढून थप्पड लगावली होती.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना थप्पड मारणाऱ्या युवकाच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांनी या आरोपी युवकाला अटक केली असून काल रात्री चौकशी केल्यानंर त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना थप्पड मारणाऱ्या आरोपी युवकाचे नाव सुरेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांच्यावर सुरेशने हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी सुरेशवर भारतीय दंड विधान कलम 323 (मारहाण करणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे.  

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघामध्ये 'रोड शो' करीत असताना सुरेशने जीपवर चढून काल थप्पड लगावली होती. अरविंद केजरीवाल यांच्यावर असा हल्ला होण्याचा ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या पाच वर्षात त्यांच्यावर नऊवेळा आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पाचवेळा हल्ला झाला आहे. एप्रिल 2016 मध्ये दिल्ली सचिवालयात पत्रकार परिषदेतच त्यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. वेदप्रकाश शर्मा असे या व्यक्तीचे नाव होते. 

तर फेब्रुवारी 2016 मध्ये लुधियानामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या कारवर काही लोकांनी लोखंडी रॉडने हल्ला केला होता. ज्यामध्ये कारची काच फुटली होती. जानेवारी 2016 मध्ये छत्रसाल स्टेडिअममध्ये महिलेने शाई फेकली होती. तसेच 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांच्या एका रिक्षाचालकाने कानाखाली मारली होती. अन्य एका ठिकाणी त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालCrime Newsगुन्हेगारी