शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejriwal: दिल्लीत १ ऑक्टोबरपासून सर्वांनाच मिळणार नाही मोफत वीज; केजरीवालांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 20:37 IST

केजरीवाल यांनी आज मंत्रिमंडळात महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये त्यांनी दिल्ली स्टार्टअप नितीला मंजुरी दिली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्लीवासियांना सरसकट १०० युनिट मोफत विजेवरील सबसिडी काढून घेण्यात आली आहे. यामुळे गेली काही वर्षे फुकटची वीज वापरणाऱ्या दिल्लीकरांना जोरदार झटका बसला आहे. 

केजरीवाल यांनी आज मंत्रिमंडळात महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये त्यांनी दिल्ली स्टार्टअप नितीला मंजुरी दिली. जर वीज ग्राहकांना विजेवरील सबसिडी नको असेल त्यांना ती सोडता यावी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे केजरीवाल म्हणाले. दिल्लीतील मोफत वीज योजना बंद करताना केजरीवाल म्हणाले की, जे लोक १ ऑक्टोबरपासून मोफत विजेसाठी सबसिडी मागतील त्यांनाच ही सबसिडी दिली जाणार आहे. यामुळे ज्यांना ही सबसिडी नको  आहे ते यातून बाजुला होणार आहेत. 

कॅबिनेटने मंजूर केलेल्या दिल्ली स्टार्टअप धोरणावर मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, तरुणांना मदत केली जाईल. भाडे, पगार, पेटंट आणि इतर खर्चासाठी मदत केली जाईल. इनक्युबेशन सेंटर सुरू करून हमीशिवाय कर्ज दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्टार्ट अप वेळेपैकी 90% वेळ मंजुरीच्या कामांमध्ये वाया जातो. यासाठी आम्ही काही एजन्सींना हे काम देणार आहोत, ज्या या स्टार्टअपना वेगवेगळ्या मंजुरी मिळण्यासाठी मदत करतील. 

चार्टर्ड अकाउंटंट्सचे पॅनेल बनवले तर ते त्यांना मदत करतील, दिल्ली सरकार त्यासाठी पैसे देईल. स्टार्टअप करणाऱ्या तरुणांना सर्व मदत मोफत दिली जाईल. तसेच दिल्ली सरकार स्टार्टअपकडून ज्या वस्तू खरेदी करेल त्या खरेदीच्या नियमांमध्येही शिथिलता आणू. परंतू गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही. एखाद्या विद्यार्थ्याने त्याच्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान एखादे उत्पादन बनविले तर त्याला 2 वर्षांपर्यंतची सुट्टी देखील दिली जाऊ शकते, असेही केजरीवाल म्हणाले.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीelectricityवीज