शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
2
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
3
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
4
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
5
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
6
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
7
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
8
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
9
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
10
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
11
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
12
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
13
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
14
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
15
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
16
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
17
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
18
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
19
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
20
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान

अरविंद केजरीवाल-कमल हसन यांच्यात आज चर्चा; चेन्नईत होणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 10:22 AM

राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले अभिनेते कमल हसन आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भेट घेणार आहेत.

ठळक मुद्दे राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले अभिनेते कमल हसन आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भेट घेणार आहेत. . केजरीवाल गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चेन्नईत पोहोचणार असून त्यानंतर ही भेट होणार असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे.पण या भेटीमागील कारणं नेमकं काय ? याबद्दलची माहिती मिळाली नाही.

नवी दिल्ली, दि. 21- राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेले अभिनेते कमल हसन आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भेट घेणार आहेत. केजरीवाल गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चेन्नईत पोहोचणार असून त्यानंतर ही भेट होणार असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. पण या भेटीमागील कारणं नेमकं काय ? याबद्दलची माहिती मिळाली नाही. कमल हसन आणि अरविंद केजरीवाल यांची ही भेट राजकीय भेट असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. अभिनेते कमल हसन राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे केजरीवाल-हसन यांची भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते आहे. तसंच या भेटीच्या माध्यमातून केजरीवाल तामिळनाडूच्या राजकारणातील संधी शोधण्याच्या प्रयत्नात आहेत, अशीही चर्चा आहे.

केजरीवाल यांचा हा दौरा अधिकृत असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयातील सुत्रांकडून समजतं आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हसन हे केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. ते दोघे दुपारी एकत्र जेवणार असून त्यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचं समजतं आहे. या भेटीसाठी कमल हसन यांनी अरविंद केजरीवाल यांना फोन केला होता आणि त्यानंतर भेट निश्चित झाल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. 

अभिनेते कमल हसन यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला तर त्यांना सहकारी पक्ष म्हणून आम आदमी पक्ष मदत करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष म्हणजे हसन यांनी या महिन्याच्या सुरुवातीलाच केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची भेट घेतली होती. दुसरीकडे केजरीवाल यांनाही देशाच्या दक्षिण भागात पक्षविस्तार करायचा आहे. त्यामुळे केजरीवाल आणि हसन यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.आम आदमी पक्षाकडून सध्या पक्षविस्ताराचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली व्यतिरिक्त पक्षाचा विस्तार करून राष्ट्रीय स्तरावर पक्ष नेऊन ठेवण्याचा आपचा विचार आहे. त्यामुळे चेन्नईत आज होणारी कमल हसन आणि अरविंद केजरीवाल यांची भेट एका नव्या अध्यायाची सुरूवात असू शकते, अशी चर्चा सध्या सुरू आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आपने गोवा आणि पंजाबमधून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत गोव्यामध्ये आपचा पराभव झाला पण पंजाबमध्ये विरोधी पक्ष म्हणून आप प्रस्थापित होऊ पाहतो आहे. तसंच गुजरात निवडणुकीत ठराविक जागा लढविण्याच्या विचारात आप आहे.