शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अरविंद केजरीवाल यांची घणाघाती टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 14:52 IST

दिल्लीमधील बहुतांश अधिकार केंद्र सरकारला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देदिल्लीमधील बहुतांश अधिकार केंद्र सरकारला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली हा निर्णय संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात आहेदिल्लीमधील सातही जागा आपच्या पारड्यात टाका, म्हणजे  आम्ही संसदेत लढून दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी सरकारला भाग पाडू

नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि  दिल्ली सरकारच्या अधिकार विभागणीबाबत सुरू असलेल्या विवादाबाबत आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे अरविंद केजरीवाल यांना धक्का बसला आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र असलेल्या दिल्लीमधील बहुतांश अधिकार केंद्र सरकारला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री साध्या चपराश्याचीही बदली करू शकत नाही. हा निर्णय म्हणजे दिल्लीच्या लोकांच्या विश्वासावर झालेला अन्याय आहे. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे.   सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर टीका करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की,''जर अशा एखाद्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली गेली जो आमचे म्हणणे ऐकतच नसेल तर मोहल्ला क्लीनिक कसे चालू राहील. जर कुणी या व्यक्तीने भ्रष्टाचार केला आहे, असे सांगितले तर मी काय करू? मी भाजपवाल्यांना सांगू का की या प्रकरणात लक्ष घाला म्हणून. हे सारे भाजपाकडूनच केले जात आहे. हा निर्णय संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात आहे.'' 

 ''यावेळी तुम्ही पंतप्रधान बनवण्यासाठी मतदान करू नका, तर दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी मतदान करा. येथील जनतेला त्यांचा अधिकार मिलाला पाहिजे. तुम्ही दिल्लीमधील सातही जागा आपच्या पारड्यात टाका, म्हणजे  आम्ही संसदेत लढून दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी सरकारला भाग पाडू. असेही केजरीवाल यांनी सांगितले. 

  दरम्यान,  दिल्लीमधील सत्ताकेंद्राच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आज सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला जोरदार धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग केंद्र सरकारच्या अधीन ठेवला आहे. तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील सेवांवर कुणाचे नियंत्रण असावे, याबाबत दोन्ही न्यायमूर्तींमध्ये मतमतांतर झाल्याने पेच फसला असून, याबाबतचा खंडित निर्णय वरिष्ठ पीठाकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र एसीबी, महसूल, तपास आयोग याबाबत दोन्ही न्यायमूर्तींमध्ये एकमत झाले. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNew Delhiनवी दिल्लीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय