शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्रातल्या 1300 सरकारी शाळा बंद केलेल्या तावडेंना दिल्लीतील शाळा दाखवा" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 16:09 IST

दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे.

नवी दिल्लीः दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. भाजपा, आप आणि काँग्रेसनं प्रचारात जोरदार आघाडी घेतलेली आहे. भाजपानंही सभा आणि रॅलींचा धडाका लावला आहे. महाराष्ट्रातील नेतेसुद्धा दिल्लीतील प्रचारात उतरले आहेत. महाराष्ट्रातल्या भाजपा सरकारमध्ये माजी शिक्षणमंत्री राहिलेल्या विनोद तावडेंसुद्धा भाजपाच्या प्रचारात दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवालांनी विनोद तावडेंवर निशाणा साधला आहे. ज्यांनी महाराष्ट्रातल्या 1300 सरकारी शाळा बंद केलेल्या आहेत. ते आता दिल्लीत भाजपाचा प्रचार करत आहेत, असं म्हणत विनोद तावडेंवर टीका केली आहे. त्याउलट आम्ही भरपूर मेहनत करून सरकारी शाळा चांगल्या केल्या आहेत. त्यांना आपली शाळा दाखवणं, छोले भटुरे खाण्यास देणे आणि दिल्ली दर्शन करवलं पाहिजे, ते अतिथी आहेत, असंही केजरीवाल म्हणाले आहेत.विनोद तावडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री होते. मात्र 2019मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं. तेच आता दिल्लीत भाजपाचा प्रचार करत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने वेगवेगळ्या राज्यांतील प्रमुख नेत्यांना त्यांच्या राज्यातील रहिवासी राहत असलेल्या भागात सभा घेण्याची जवाबदारी दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी देवळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अरविंद कुमार यांच्या समर्थनार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी शाहीन बाग आणि त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीवरून केजरीवाल सरकारवर टीका केली. तर केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले की, जर तुम्ही देशाबरोबर असाल तर तुम्ही देश तोडण्याची भाषा करणाऱ्या आरोपींच्या खटल्यांच्या फाईल का दाबून ठेवत आहात. देशाचे टुकडे करू असे म्हणणाऱ्या लोकांच्या विरोधातील फाईल गेल्या 8 महिन्यांपासून दाबून ठेवण्यात आल्या असून, अशा देशद्रोह्यांवर कारवाई केजरीवाल का होऊ देत नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे