शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Arvind Kejariwal: देशासाठी जीव देण्याचीही तयारी, हल्ल्यानंतर केजरीवालांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 17:01 IST

भाजपकडून गुंडागर्दीचं उपद्रवी राजकारण होत असून या कृत्यातून देशाला चुकीचा संदेश दिला जात आहे.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर बुधवारी दुपारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, असा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी केला आहे. ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या विरोधात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध हे कार्यकर्ते करीत होते. या हल्ल्यानंतर आपच्या नेत्यांनी भाजववर शरसंधान साधले आहे. आता, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत आपलं मत मांडलं आहे. देशासाठी जीव देण्यासही मी तयार असल्याचे त्यांनी म्हटले. 

''भाजपकडून गुंडागर्दीचं उपद्रवी राजकारण होत असून या कृत्यातून देशाला चुकीचा संदेश दिला जात आहे. अरविंद केजरीवाल नाही, तर देश महत्त्वाचा आहे. मी देशासाठी माझा जीवही देऊ शकतो. मात्र, या उपद्रवामुळे भारताची प्रगती होणार नाही,'' असे केजरीवाल यांनी म्हटले.  काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी द काश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल बोलताना खोट्या माहितीच्या आधारावर चित्रीकरण केल्याचा आरोप केला. याच्या निषेध करण्यासाठी दिल्ली भाजपचे प्रवक्ता तेजिंदरपाल बग्गा यांच्या नेतृत्वात निवासस्थानासमोर अकरा वाजता १५०-२०० कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे व बॅरिकेट्स तोडले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हुसकावून लावले. त्यानंतर,  पंजाबमध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपने मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. 

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया म्हणाले

मनीष सिसोदिया म्हणाले की, "भाजप अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीत पराभूत करू शकत नाही. त्यामुळे भाजपला त्यांना मारायचे आहे. हा अतिशय विचारपूर्वक केलेला कट आहे. मी भाजपला सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका. अशाप्रकारे हल्ले करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करू, हे देश खपवून घेणार नाही."

भगवंत मान यांनीही केला भाजपवर हल्लाबोल

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal)यांच्या घरावरील हल्ला हे भ्याड कृत्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीकडून झालेल्या दारूण पराभवामुळे भाजपचा राग स्पष्टपणे दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत झाल्याचा आरोपही भगवंत मान यांनी केला आहे. ते म्हणाले, आता स्पष्ट झाले आहे की भाजप फक्त आप आणि अरविंद केजरीवाल यांना घाबरत आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआपThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्स