Arvind Kejariwal: देशासाठी जीव देण्याचीही तयारी, हल्ल्यानंतर केजरीवालांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 05:00 PM2022-03-31T17:00:43+5:302022-03-31T17:01:38+5:30

भाजपकडून गुंडागर्दीचं उपद्रवी राजकारण होत असून या कृत्यातून देशाला चुकीचा संदेश दिला जात आहे.

Arvind Kejariwal: Also ready to give his life for the country, Arvind Kejriwal targeted BJP | Arvind Kejariwal: देशासाठी जीव देण्याचीही तयारी, हल्ल्यानंतर केजरीवालांचा भाजपवर निशाणा

Arvind Kejariwal: देशासाठी जीव देण्याचीही तयारी, हल्ल्यानंतर केजरीवालांचा भाजपवर निशाणा

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर बुधवारी दुपारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, असा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी केला आहे. ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या विरोधात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध हे कार्यकर्ते करीत होते. या हल्ल्यानंतर आपच्या नेत्यांनी भाजववर शरसंधान साधले आहे. आता, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत आपलं मत मांडलं आहे. देशासाठी जीव देण्यासही मी तयार असल्याचे त्यांनी म्हटले. 

''भाजपकडून गुंडागर्दीचं उपद्रवी राजकारण होत असून या कृत्यातून देशाला चुकीचा संदेश दिला जात आहे. अरविंद केजरीवाल नाही, तर देश महत्त्वाचा आहे. मी देशासाठी माझा जीवही देऊ शकतो. मात्र, या उपद्रवामुळे भारताची प्रगती होणार नाही,'' असे केजरीवाल यांनी म्हटले. 


काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी द काश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल बोलताना खोट्या माहितीच्या आधारावर चित्रीकरण केल्याचा आरोप केला. याच्या निषेध करण्यासाठी दिल्ली भाजपचे प्रवक्ता तेजिंदरपाल बग्गा यांच्या नेतृत्वात निवासस्थानासमोर अकरा वाजता १५०-२०० कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे व बॅरिकेट्स तोडले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हुसकावून लावले. त्यानंतर,  पंजाबमध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपने मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. 

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया म्हणाले

मनीष सिसोदिया म्हणाले की, "भाजप अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीत पराभूत करू शकत नाही. त्यामुळे भाजपला त्यांना मारायचे आहे. हा अतिशय विचारपूर्वक केलेला कट आहे. मी भाजपला सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका. अशाप्रकारे हल्ले करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करू, हे देश खपवून घेणार नाही."

भगवंत मान यांनीही केला भाजपवर हल्लाबोल

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal)यांच्या घरावरील हल्ला हे भ्याड कृत्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीकडून झालेल्या दारूण पराभवामुळे भाजपचा राग स्पष्टपणे दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत झाल्याचा आरोपही भगवंत मान यांनी केला आहे. ते म्हणाले, आता स्पष्ट झाले आहे की भाजप फक्त आप आणि अरविंद केजरीवाल यांना घाबरत आहे.
 

Web Title: Arvind Kejariwal: Also ready to give his life for the country, Arvind Kejriwal targeted BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.