शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 09:09 IST

Arunachal Pradesh & Sikkim Assembly Election Result 2024: देशात झालेल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे. मात्र तत्पूर्वी आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे.

देशात झालेल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे. मात्र तत्पूर्वी आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. यामध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाने बहुमताच्या दिशेने कूच केली आहे. तर सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने निर्विवाद आघाडी घेतली आहे. 

६० जागा असलेल्या अरुणाचल प्रदेश विधानसभेमध्ये सत्ताधारी भाजपाने १० जागांवर आधीच बिनविरोध विजय मिळवला होता. तर आज होत असलेल्या ५० जागांवरील मतमोजणीमध्ये भाजपाने आतापर्यंत २८ जागांवर आघाडी घेतली आहे. अरुणाचलमध्ये बहुमताचा आकडा ३१ आहे. मात्र आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये ३८ पेक्षा अधिक जागांवर भाजपा पुढे आहे. तर अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी ८, पीपल्स पार्टी अरुणाचल ३, राष्ट्रवादी काँग्रेस २, काँग्रेस १ आणि अपक्ष २ जागांवर आघाडीवर आहेत. अरुणाचल प्रदेशमध्ये ज्या दहा जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू यांचाही समावेश आहे.

तर विधानसभा सदस्यसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य असलेल्या सिक्कीममध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने निर्विवाद आघाडी घेतली आहे. विधानसभेच्या ३२ जागा असलेल्या सिक्कीममध्ये ३० जागांसाठी मतमोजणी होत असून, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने २९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट पक्षाने एका जागेवर आघाडी घेतली आहे.  एकीकडे सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने मोठी आघाडी घेतली असताना माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्यासह विरोधी पक्षांमधील अनेक नेते पिछाडीवर पडले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठीची मतदानाची प्रक्रिया शनिवारी आटोपली असून, सात टप्प्यात झालेल्या मतदानानंतर आता मंगळवार ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी काल प्रसिद्ध झालेल्या विविध एक्झिट पोलमधून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार येईल, असा अंदाज वर्तवला आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला या निवडणुकीत ३५० ते ४०० जागा मिळतील, असा दावा बहुतांश एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे.  

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशsikkimसिक्किमElectionनिवडणूक 2024lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४