शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

'लाइफ सपोर्ट'ला सकारात्मक प्रतिसाद नाही; दहा दिवसांनंतरही अरुण जेटलींची प्रकृती गंभीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 11:49 IST

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना व्हेंटिलेटरवरून आता एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) आणि इंट्रा ऑटिर्क बलून सपोर्ट (IABP) सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. ही पायरी व्हेंटिलेटरच्या पुढची मानली जाते. त्यामुळेच अरुण जेटलींची प्रकृती आणखी खालावल्याचं सांगितलं जातंय. गेल्या 10 दिवसांपासून जेटली हे नवी दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेत आहेत. मात्र, अद्यापही त्यांच्या प्रकृतीत कुठलिही सुधारणा नसल्याचं समजतंय. 

श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं 9 ऑगस्ट रोजी अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक ते सर्व उपचार सुरू आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक प्रमुख नेतेमंडळी एम्समध्ये येऊन जेटलींच्या प्रकृतीची विचारपूस करून आलेत. आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एम्सला भेट दिली. एकीकडे वैद्यकीय उपचार सुरू असताना भाजपाचे कार्यकर्ते आणि सर्वच हितचिंतक जेटलींच्या आरोग्यासाठी प्रार्थना, हवनही करत आहेत. तसेच, देशभरातून भाजपा कार्यकर्ते आणि जेटलींचे चाहते त्यांनी लवकर बरे व्हावे यासाठी देवाचा धावा करत आहेत. 

दरम्यान, एक्स्ट्राकोर्पोरियल मेंब्रेन ऑक्सिजनेशन ही अत्यंत अद्ययावत लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे. ही यंत्रणा रुग्णाच्या शरीरातील रक्त काढते, त्यातील कार्बनडाय ऑक्साईड बाजूला करून हे रक्त 'ऑक्सिजनेट' केलं जातं आणि पुन्हा रुग्णाच्या शरीरात सोडलं जातं. हृदय आणि फुफ्फुसाची क्रिया जेव्हा योग्य रितीने होत नसते आणि व्हेंटिलेटरचाही तितकासा उपयोग नसतो, त्यावेळी ECMO चा आधार घेतला जातो.  

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीAIIMS hospitalएम्स रुग्णालयNew Delhiनवी दिल्ली