अरुण जेटलींनी गैरव्यवहार केला नाही - चौकशी आयोग
By Admin | Updated: December 27, 2015 13:37 IST2015-12-27T13:37:42+5:302015-12-27T13:37:42+5:30
दिल्ली क्रिकेट संघटनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी दिल्ली सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी आयोगाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या विरोधात एकही पुरावा सापडलेला नाही.

अरुण जेटलींनी गैरव्यवहार केला नाही - चौकशी आयोग
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - दिल्ली क्रिकेट संघटनेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी दिल्ली सरकारने नेमलेल्या त्रिसदस्यीय चौकशी आयोगाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या विरोधात एकही पुरावा सापडलेला नाही. डीडीसीएच्या अध्यक्षपदावर असताना जेटली यांनी कोणताही भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार केल्याचे एकही प्रकरण चौकशी समितीच्या निदर्शनास आले नाही.
दिल्ली सरकारच्या चौकशी समितीचा हा अहवाल म्हणजे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी एक धक्का आहे. कारण अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाने अरुण जटेली यांच्यावर डीडीसीए घोटाळया संदर्भात अनेक गंभीर आरोप केले आहेत.
या २४७ पानी अहवालात कोटला स्टेडियमची पूर्नरचना करताना कॉर्पोरेट बॉक्सेस बांधणीमध्ये अनियमितात झाल्याचे ताशेरे ओढले आहेत. पण म्हणून जेटली यांना त्यासाठी जबाबदार धरलेले नाही.
दोन आठवडयांपूर्वी सीबीआयने दिल्ली सचिवालयातील कार्यालयावर छापा मारल्यानंतर आपने डीडीसीए घोटाळयाची फाईल ताब्यात घेण्यासाठी छापा मारल्याचा दावा केला होता. डीडीसीए घोटाळयामुळे अरुण जेटली अडचणीत येतील. त्यांना वाचवण्यासाठी छापेमारीची कारवाई केली असा आरोप आपने केला होता.