महेश प्रगती मंडळातर्फे कृत्रिम पाय वाटप शिबिर
By Admin | Updated: September 11, 2015 21:24 IST2015-09-11T21:24:57+5:302015-09-11T21:24:57+5:30
जळगाव- महेश प्रगती मंडळ, वैदिक यात्रा परिवार आणि महावीर सेवा सदन कोलकाता यांच्या संयुक्तविद्यमाने १४ आणि १५ सप्टेंबर दरम्यान पाय नसलेल्या अपंग बांधवांना कृत्रिम पाय बनवून दिले जाणार असल्याची माहिती आयोजित पत्रपरिषदेत सोनल लाठी यांनी दिली़

महेश प्रगती मंडळातर्फे कृत्रिम पाय वाटप शिबिर
ज गाव- महेश प्रगती मंडळ, वैदिक यात्रा परिवार आणि महावीर सेवा सदन कोलकाता यांच्या संयुक्तविद्यमाने १४ आणि १५ सप्टेंबर दरम्यान पाय नसलेल्या अपंग बांधवांना कृत्रिम पाय बनवून दिले जाणार असल्याची माहिती आयोजित पत्रपरिषदेत सोनल लाठी यांनी दिली़ महेश प्रगती हॉल येथे शुक्रवारी ही पत्रपरिषद पार पडली़ यावेळी मंचावर राजेश लाठी आणि महेश प्रगती मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण बेहडे उपस्थित होते़ शिबिरात आलेल्या अपंगांचा सर्व खर्च महेश प्रगती मंडळाकडून केला जाणार आहे़ आतापर्यंत जिल्हाभरातून २०० अपंग बांधवांनी नोंदणी केली आहे़ सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिबिर सुरू राहणार आहे अशी माहिती राजेश लाठी यांनी पत्रपरिषदेत दिली़ तर शिबिराच्या दिवशी आलेल्या अपंग बांधवांनादेखील शिबिराचा लाभ घेता येणार आहे़ अधिक माहितीसाठी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण बेहडे यांनी यावेळी केले़