दहशतवाद्यांना पैसा पुरवणाऱ्यांना अटक
By Admin | Updated: June 29, 2016 06:02 IST2016-06-29T06:02:03+5:302016-06-29T06:02:03+5:30
दहशतवादी कारवायांसाठी हवालामार्गे लाखो रुपये देणाऱ्या ३७ जणांना काश्मीरमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी विधानसभेत यांनी दिली.

दहशतवाद्यांना पैसा पुरवणाऱ्यांना अटक
श्रीनगर : दहशतवादी कारवायांसाठी हवालामार्गे लाखो रुपये देणाऱ्या ३७ जणांना काश्मीरमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी विधानसभेत यांनी दिली. त्या म्हणाल्या की गेल्या तीन वर्षांमध्ये हवालाचे १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाल्या की २0१३ साली आठ, २0१४ साली तीन आणि गेल्या वर्षीपासून आतापर्यंत एक हवालाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये मिळून ३७ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३६ लाख ७0 हजार रुपये रोख तसेच ९00 अमेरिकन डॉलर्स आणि ३३ सोन्याची नाणी जप्त करण्यात आली. राज्यात दहशतवादी कारावाया करण्यासाठी या पैशाचा वापर होत होता, असे तपासामध्ये आढळून आले आहे. मात्र कोणत्याही फुटीरवादी नेत्याला हा पैसा मिळाल्याचे आतापर्यंत आढळून आलेले नाही.
याशिवाय बनावट चलनही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले असून, त्यात भारतीय चलनातील ५१ लाख १५ हजार रुपये आणि ६९८0 अमेरिकन डॉलर्स यांचा समावेश असल्याची माहितीही मेहबुबा मुफ्ती यांनी दिली. (वृत्तसंस्था)