दिग्विजय सिंह विरुद्ध न्यायालयाने काढले अटक वॉरंट
By Admin | Updated: February 26, 2016 20:45 IST2016-02-26T20:15:52+5:302016-02-26T20:45:30+5:30
मध्यप्रदेश विधानसभा भरती प्रक्रियेतील घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह आज न्यायालयात हजर न राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट काढण्यात आले आहे.

दिग्विजय सिंह विरुद्ध न्यायालयाने काढले अटक वॉरंट
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. २६ - मध्यप्रदेश विधानसभा भरती प्रक्रियेतील घोटाळाप्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह आज न्यायालयात हजर न राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट काढण्यात आले आहे. तसेच त्यांना उद्या सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
मध्यप्रदेश विधानसभा भरती प्रक्रियेतील घोटाळाप्रकरणी आज न्यायलयात सुनानवणीसाठी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हजर न राहिल्यामुळे अडचणीत आले आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि मध्यप्रदेश राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष श्रीविश्वास तिवारी हे दोघे मुख्य आरोपी आहेत. त्यांच्यावर आपल्या पदाचा आणि सत्तेचा गैरवार केल्याचा आरोप आहे. दिग्विजय सिंह मुख्यमंत्री असताना १९९३ ते २००३च्या दरम्यान १७ लोकांची विधानसभा सचिवालय नेमणूक केली होती. असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात एकून २४ जण आरोपी आहेत.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिग्विजय सिंह आणि श्रीविश्वास तिवारी यांच्या विरुद्ध मध्यप्रदेश मधील जहांगीराबाद पोलिस स्थानकात एफ.आय.आऱ दाखल केली होती.