केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात अटक वॉरंट

By Admin | Updated: March 10, 2017 21:48 IST2017-03-10T21:37:04+5:302017-03-10T21:48:34+5:30

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात अलीपुर कोर्टाने अटक वॉरंट काढलं आहे.

Arrest warrant against Union Minister Babul Supriyo | केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात अटक वॉरंट

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात अटक वॉरंट

>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 10 -  केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या विरोधात अलीपुर कोर्टाने अटक वॉरंट काढलं आहे. गुरूवारी पोलिसांनी बाबुल सुप्रीयो यांच्याविरोधात कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं.  तृणमुल कांग्रेसच्या आमदार महुआ मोइत्रा यांनी सुप्रियो यांच्याविरोधात तक्रार केली होती. 
 
3 जानेवारी रोजी एका टीव्ही चॅनलवर भाजपा खासदार सुप्रियो यांनी आपल्याविरोधात अवमानकारक वक्तव्य केलं असा आरोप मोइत्रा यांनी केला आहे.  4 जानेवारी रोजी  महुआ मोइत्रा यांनी सुप्रियो यांच्याविरोधात अलिपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.  या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी सुप्रियो यांना तीन वेळेस समन्स बजावला होता. पण ते एकदाही चौकशीसाठी हजर झाले नाही. 
 
आरोपपत्र दाखल करताना पोलिसांनी टीव्ही कार्यक्रमातील ते फूटेजही कोर्टात जमा केलं आहे.    
 

Web Title: Arrest warrant against Union Minister Babul Supriyo