शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सनातनी कालीचरणला अटक करा अन् ठेचून काढा, जितेंद्र आव्हाडांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 16:49 IST

महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशभरातून कालीचरण महाराजावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुंबई - अकोल्याच्या कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) याने एका कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. कालीचरण महाराजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. अपशब्दांचा वापर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याच्या विधिमंडळातील हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद पाहायला मिळाले. मंत्री नवाब मलिक यांनी कालीचरणवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर, आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही कालीचरणच्या अटकेची मागणी केली आहे.

महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशभरातून कालीचरण महाराजावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्याच्या विधानसभेत मंत्री नवाब मलिक, नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार यांनीही कालीचरण यांच्या विधानाबद्दल आक्षेप घेत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. आता, गृहनिर्माणमंत्री   कालीचरण बाबा मूळचा अकोल्याचा आहे. कधी आरक्षण, कधी मुस्लीम विरोध तर कधी स्त्री हक्क विरोधात तो गरळ ओकत असतो आणि या ऐकणाऱ्यांच्या मनात विष पसरविण्याचे काम करतो. अशा विषारी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि ठेचून सुद्धा काढा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडे केली आहे. तसेच, हा सनातनी आहे, निवडणुकीला उभा राहिला तेव्हा 247 मत मिळाली, असेही आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले.  आव्हाड यांनी आणखी एक ट्विट केलं असून या ट्विटमध्ये कालीचरण बाबाचा त्याच व्यासपीठावर निषेध नोंदविणाऱ्या संतांना सलाम केला आहे.  ''हे खरे हिंदू संत जे भर धर्म संसदेत महात्मा गांधी ह्यांच्या विषयी जी भाषा वापरली त्याचा जाहीर निषेध तिथल्यातिथे केला आणि सभात्याग केला. सलाम...'' असेही आव्हाड यांनी म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची कडक भूमिका

दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "गुंडांनी जर भगवी वस्त्र धारण केली तर त्यांना संत म्हणता येणार नाही" असं म्हणत निशाणा साधला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी तातडीने एफआयआर दाखल करुन घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच या प्रकरणामध्ये दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असंही बघेल यांनी म्हटलं आहे. 

दोषींवर कारवाई करणार - बघेल

आता एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. या प्रकरणासंदर्भात कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एखाद्या कटाप्रमाणे वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भूपेश बघेल यांनी केला आहे. चौकशीनंतर संबंधित प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडAkolaअकोलाMahatma Gandhiमहात्मा गांधी