शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक; १०० कोटींच्या कथित मद्य धोरणप्रकरणी ईडीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 07:22 IST

दोन तास जबाब नाेंदविल्यानंतर रात्री ९ वाजता घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : शंभर कोटी रुपयांच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केली. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण देण्यास नकार देताच ईडीचे पथक केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले.  केजरीवाल यांचा सुमारे दोन तास जाबजबाब नोंदविल्यानंतर त्यांना अटक करुन ईडीच्या मुख्यालयात नेण्यात आले.

केजरीवाल यांनी बीआरएसच्या नेत्या के. कविता, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह मद्य धोरण घोटाळ्याचे कारस्थान रचल्याचा ईडीचा आरोप आहे. केजरीवाल यांची अटक रद्द करण्यासाठी त्यांच्या विधी सल्लागारांनी रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयात अर्ज दाखल केला.

दिल्ली पोलिसांकडून जमावबंदीचे आदेश

केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पोहोचताच दिल्ली पोलीस आणि जलद कृती दलाच्या जवानांसह कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला. तसेच ईडी कार्यालय परिसरात दिल्ली पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. मात्र, ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी केजरीवाल यांचे समर्थक मोठ्या संख्येने या परिसरात पोहोचले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

लोकशाही संपवण्याचा कट

अरविंद केजरीवाल यांना अटक करून भाजप सत्तेसाठी कोणती पातळी गाठू शकते, हे स्पष्ट होते, असे शरद पवार म्हणाले. तर ही कारवाई लोकशाही संपवण्याचा कट असल्याचा आरोप झारखंड मुक्ती मोर्चाने केला.

तरी ते राजीनामा देणार नाहीत

केजरीवाल यांना अटक झाली, तरी ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही. ते तुरुंगातून सरकार चालवतील, अशी चर्चा सुरु होती. त्यास विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी दुजोरा दिला. मात्र, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केल्यानंतर त्यांना राजीनामा दिला होता. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालArrestअटकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयdelhiदिल्लीPoliceपोलिस