प.बंगालमधील नन बलात्कारप्रकरणी मुख्य आरोपीला अटक
By Admin | Updated: May 8, 2015 14:45 IST2015-05-08T10:29:35+5:302015-05-08T14:45:48+5:30
पश्चिम बंगालमधील ननवरील बलात्कार प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिलन सरकार असे त्याचे नाव असून सीआयडीने त्याला सिलदाह येथून अटक केली.

प.बंगालमधील नन बलात्कारप्रकरणी मुख्य आरोपीला अटक
ऑनलाइन लोकमत
कोलाकाता, दि. ८ - पश्चिम बंगालमधील ननवरील बलात्कार प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिलन सरकार असे त्याचे नाव असून सीआयडीने त्याला सिलदाह येथून अटक केली.
मार्च महिन्यात पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील गंगनापूर येथे दरोडेखोरांनी ७१ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता. दरोडेखोरांच्या टोळक्याने रात्री बाराच्या सुमारास कॉन्व्हेंट स्कूलमध्ये प्रवेश करून ननवर बलात्कार केला. त्यानंतर स्कूलमधील १२ लाख रुपयांवरही त्यांनी डल्ला मारला.
याप्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले होते. याप्रकरणी पोलिसांनी याआधी तीन जणांना अटक केली आहे.