मित्राचा खून प्रकरणी आरोपीस अटक करमनवाडीची घटना: जुन्या भांडणाचे कारण

By Admin | Updated: August 17, 2015 22:38 IST2015-08-17T22:38:41+5:302015-08-17T22:38:41+5:30

कर्जत : जुन्या भांडणाच्या कारणावरून मित्राला दारू पाजून त्याचा खून केला. याप्रकरणी आरोपीस कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार करमनवाडी येथे घडला.

Arrest of accused in friend's murder case: Carnamwadi incident: old reasoning | मित्राचा खून प्रकरणी आरोपीस अटक करमनवाडीची घटना: जुन्या भांडणाचे कारण

मित्राचा खून प्रकरणी आरोपीस अटक करमनवाडीची घटना: जुन्या भांडणाचे कारण

्जत : जुन्या भांडणाच्या कारणावरून मित्राला दारू पाजून त्याचा खून केला. याप्रकरणी आरोपीस कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार करमनवाडी येथे घडला.
कर्जत तालुक्यातील करमनवाडी येथील अशोक तुकाराम पुणेकर व बबन दादाराम सायकर हे दोघे मित्र व स्नेही होते. त्यांच्यात पूर्वी वाद झाला होता. आता मात्र ते एकत्र होते. जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी अशोक पुणेकर याने बबन सायकर याला दारू पाजली. यानंतर त्याचा खून केला व हा मृतदेह करपडी फाट्याजवळील मारूती मंदिरात ठेवला. हा प्रकार २१ जुलै रोजी घडला. त्यावेळी या प्रकरणी आकस्मिक निधनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मयत बबन सायकर याची पत्नी सीमा सायकर हिने कर्जत पोलिसात फिर्याद दिली होती. यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार राजकुमार ससाणे यांनी या गुन्ह्याचा कसून तपास केला. नंतर हे सत्य बाहेर आले. यातील आरोपी अशोक पुणेकर याला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.
कोंभळी येथे निवडणुकीच्या कारणावरून भाजपाचे कार्यकर्ते संजय गांगर्डे यांच्या खुनातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी मागणी मयताची मुलगी किरण गांगर्डे हिने पोलीस प्रशासनाकडे केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Arrest of accused in friend's murder case: Carnamwadi incident: old reasoning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.