शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Arpita Mukherjee: अर्पिता मुखर्जींना घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात; ED च्या धाडीत सापडले होते २१ कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 23:35 IST

शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या कारचा अपघात झाला आहे.

कोलकाता-

शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या कारचा अपघात झाला आहे. ईडीचा ताफा अर्पिया मुखर्जी यांना कोर्ट परिसरातून सीजीओ कॉम्प्लेक्सच्या दिशेनं जात असताना कारचा अपघात झाला. ही घटना सीजीओ कॉम्प्लेक्स परिसरातील सॉल्ट लेक परिसरातील आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, अर्पिता मुखर्जी सुरक्षित असून किरकोळ दुर्घटना होती. त्यामुळे सुदैवानं कोणतीही हानी झालेली नाही. शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरुन अर्पिता मुखर्जी यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच त्यांची जामीन याचिका देखील नाकारली आहे. ईडी आता उद्या अर्पिता यांना पीएमएलए कोर्टात हजर करणार आहे. या संपूर्ण घोटाळ्यात आणखी किती जणांची नावं आहेत हे शोधण्याचा ईडी प्रयत्न करत आहे. 

 ईडीच्या छाप्यांमध्ये शुक्रवारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली होती. पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्यातून ही रक्कम मिळाल्याचा संशय आहे. सूत्रांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेसचे मंत्री पार्थ चॅटर्जी अनेकदा अर्पिता मुखर्जीच्या घरी जात असत. यासोबतच पार्थ चॅटर्जी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही वृत्त आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी टॉलीगंजच्या डायमंड सिटी कॉम्प्लेक्समधील अर्पिता मुखर्जी यांच्या आलिशान घरातून रोख रकमेसह २० मोबाइल फोनही जप्त केले आहेत. ईडी अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की,  हे मोबाईल फोन WBSSC आणि WBBPE मधील शिक्षक भरती घोटाळ्यासाठी एक महत्त्वाचा दुवा ठरू शकतात. ईडीने निवेदनात दावा केला आहे की, शिक्षक भरती घोटाळ्याच्या संदर्भात विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत होते, यावेळी मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली होती. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय