शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

डझनभर एफआयआर दाखल होताच अर्णब गोस्वामींची सर्वोच्च न्यायालयात धाव; आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 11:16 IST

अनेक राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एफआयआर दाखल

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल कथित अपमानास्पद उद्गार काढल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात देशभरात डझनभर याचिका दाखल झाल्या आहेत. यानंतर अर्णब यांनी दिलासा मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अर्णब यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर आज सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि एम. आर. शाह याचिकेवर सुनावणी घेणार आहेत. बुधवारी रात्री ऑन एअर गेलेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी यांच्याबद्दल कथित अनुद्गार काढल्याप्रकरणी काँग्रेसशासित राज्यांमध्ये डझनभर एफआयएर दाखल झाले आहेत. महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगढ, राजस्थान, झारखंडमधल्या पोलीस ठाण्यांमध्ये अर्णब यांच्याविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी एफआयआर नोंदवले आहेत. बुधवारी झालेल्या कार्यक्रमानंतर आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप अर्णब यांनी केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पालघरमध्ये झालेल्या मॉब लिंचिंगबद्दल सोनिया गांधी गप्प का, असा सवाल अर्णब यांनी उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी सोनिया यांच्या इटालियन पार्श्वभूमीचा उल्लेख केला. अर्णब यांचं विधान निषेधार्ह असल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं होतं. सोनिया गांधी भारतात आल्या त्यावेळी त्यांचं वय २२ वर्षे होतं. त्या गेल्या ५२ वर्षांपासून भारतात राहत आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा मोठा काळ भारताची सेवा केली आहे, असं सिंग म्हणाले. 

आणखी वाचा...

सावधान! आता पीएफ अ‍ॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल

मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह

विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात

कोरोनाचे दुष्परिणाम; तब्बल २५ कोटी  बळी जाण्याची भीती 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी