शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

अर्णब गोस्वामींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका, विधानसभा सचिवांना बजावली नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 16:38 IST

अर्णब गोस्वामी यांना धमकी देणाऱ्या एका पत्रासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाने ही अवमानना नोटीस बजावली आहे. (Arnab goswami, Supreme Court, Uddhav Thackeray)

ठळक मुद्देअर्णब गोस्वामी यांना धमकी देणाऱ्या एका पत्रासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाने ही अवमानना नोटीस बजावली आहे. या प्रकरणात न्यायालयाने विधानसभा सचिवांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.

नवी दिल्ली/मुंबई - राज्यातील ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा जोरदार झटका बसला आहे. महाराष्ट्र विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार हनन प्रकरणात, रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेस  सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एवढेच नाही, तर या प्रकरणात न्यायालयाने विधानसभा सचिवांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने दोन आठवड्यांचा कालावधी दिला आहे.

अर्णब गोस्वामी यांना धमकी देणाऱ्या एका पत्रासंदर्भात सर्वोच्च न्यायलयाने ही अवमानना नोटीस बजावली आहे. यावेळी, विधानसभा अध्यक्ष आणि विशेषाधिकार समितीद्वारे पाठवण्यात आलेली नोटीस ही गोपनीय असल्याचे कारण देत, हे पत्र न्यायालयात सादर करू नये, यासाठी पत्र कसे लिहिले गेले? अशा पद्धतीने, कुणालाही कशी भीती दाखवली जाऊ शकते?' असे प्रश्नही न्यायालयाने केले आहेत. एढेच नाही, तर याप्रकरणी विधानसभा सचिवांविरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस का देण्यात येऊ नये?', असा प्रश्नही न्यायालयाने नोटिशीमध्ये केला आहे. देशात कोणतीही व्यवस्था कुणालाही न्यायालयापर्यंत जाण्यापासून रोखू शकत नाही. अर्णब यांना अशा पद्धतीचे पत्र लिहून त्यांना न्याय प्रशासनाकडे जाऊ न देणे, हे न्यायात हस्तक्षे केल्यासारखेच आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

CM उद्धव ठाकरे यांच्या अवमाननेप्रकरणी अर्णब यांच्या विरोधात हक्कभंग सूचना -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवमाननेप्रकरणी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत पत्रकार अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंग सूचना मांडण्यात आली होती. याशिवाय, अर्णव गोस्वामींना विधिमंडळाने दिलेली नोटीस गोपनीय असतानाही त्यांनी ते पत्र न्यायालयासमोर सादर केले. हा प्रकारदेखील हक्कभंगाचाच आहे, असे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते.

अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक -सध्या, रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगडपोलिसांनी अटक केली आहे. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात, 'अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आपल्या पतीने आत्महत्या केली. अन्यथा ते आज जिवंत असते, असा गंभीर आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे.' 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयarnab goswamiअर्णब गोस्वामीState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे