शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

TRP Scam: रेटिंग फिक्स करण्याच्या मोबदल्यात अर्णब गोस्वामींनी दासगुप्तांना ३ वर्षांत दिले ४० लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 14:49 IST

फॅमिली ट्रिपसाठीही १२ हजार डॉलर्स दिल्याचा दासगुप्ता यांचा जबाब

ठळक मुद्देफॅमिली ट्रिपसाठीही १२ हजार डॉलर्स दिल्याचा दासगुप्ता यांचा जबाबTRP सिस्टम कशी काम करते याची गोस्वामी यांना कल्पना होती, दासगुप्ता यांची माहिती

टीआरपी स्कॅम केसमध्ये रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासमोरील समस्या वाढताना दिसत आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊंन्सिल (BARC) इंडियाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांकडे लिखित स्वरूपात एक धक्कादायक दावा केला आहे. अर्णब गोस्वामी यांनी आपल्यालाल फॅमिली ट्रिपसाठी १२ हजार डॉलर्स दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच सप्लिमेंट्री चार्जशीटनुसार वृत्तवाहिनीच्या बाजूनं रेटिंग देण्यासाठी अर्णब गोस्वामी यांनी तीन वर्षांमध्ये ४० लाख रूपये मिळाले असल्याचंही दासगुप्ता यांनी सांगितल्याचं नमूद केलं आहे. मुंबई पोलिसांनी ११ जानेवारी रोजी ३,६०० पानांची एक सप्लिमेंट्री चार्जशीट दाखल केली होती. यामध्ये BARC चा एक फॉरेन्सिक ऑटिड रिपोर्ट, दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यातील कथित व्हॉट्सअॅप चॅट आणि माजी काऊंन्सिल कर्मचारी आणि केबल ऑपरेटर्ससह ५९ लोकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सप्लिमेंट्री चार्जशीट दासगुप्ता, माजी BARC सीओओ रोमिल रमगढिया आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे. पहिली चार्जशीट १२ जणांविरोधात नोव्हेंबर २०२० मध्ये दाखल झाली होती. दुसऱ्या चार्जशीटनुसार दासगुप्ता यांचा जबाब २७ डिसेंबर २०२० रोजी क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या कार्यालयात दोन साक्षीदारांच्या समोर संध्याकाळी सव्वा पाच वाजता नोंदवण्यात आला. मदतीचं आश्वासन"मी अर्णब गोस्वामींना २००४ पासून ओळखतो. २०१३ मध्ये BARC चं मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद स्वीकारलं. अर्णब गोस्वामी यांनी २०१७ मध्ये रिपब्लिक टीव्ही लाँच केला. त्यांनी लाँचिंगच्या पूर्वीच मला प्लॅनबाबत सांगितलं होतं आणि इशाऱ्या इशाऱ्यात त्यांनी वाहिनीला चांगलं रेटिंग देण्यासाठी मदतही मागितली होती. टीआरपी सिस्टम कसं काम करतं हे गोस्वामी यांना उत्तमरित्या माहित होतं. भविष्यात आपली मदत मिळावी यासाठी त्यांनी सांगितलं होतं," असं दासगुप्ता यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे. ट्रिपसाठी १२ हजार डॉलर्स"मी टीआरपी रेटिंगमध्ये फेरफार करण्यासाठी आपल्या टीमसोबत काम केलं. त्यानंतर रिपब्लिक टीव्हीला पहिल्या क्रमांकाचं रेटिंग मिळालं. २०१७-२०१९ दरम्यान हे सुरू होतं. याच्या मोबदल्यात २०१७ मध्ये अर्णब यांनी लोअर परळ येथील सेंट रेझिस हॉटेलमध्ये माझी भेट घेतली आणि माझ्या फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या फॅमिली ट्रिपसाठी ६ हजार डॉलर्स दिलं. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी सेंट रेझिसमध्ये माझी पुन्हा भेट घेतली आणि मला स्वीडन आणि डेनमार्कच्या फॅमिली ट्रिपसाठी ६ हजार डॉलर्स दिले," असंही दासगुप्ता यांनी आपल्या जबाबात सांगितलं. "२०१७ मध्ये अर्णब मला आयटीसी परेल हॉलेमध्ये भेटले आणि त्यांनी मला रोख २० लाख दिले. त्यानंतर २०१८ आणि २०१९ मध्ये गोस्वामी यांनी पुन्हा १०-१० लाख रूपये दिले," असंही दासगुप्ता यांनी सांगितलं. दरम्यान, दासगुप्ता यांच्या वकिलांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दासगुप्ता यांचं हा जबाब नाकारत असल्याचं सांगितलं. तसंच हा जबाब दबावाखाली नोंदवला गेला असू शकतो आणि त्याची न्यायालयात कोणतीही सत्यता नाही, असंही त्यांनी म्हटलं.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीRepublic TVरिपब्लिक टीव्हीTRP Scamटीआरपी घोटाळाMumbaiमुंबईPoliceपोलिस