शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

बाबा राम रहीमच्या भक्तांना देण्यात येत होतं शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण - सैन्यानं दिला होता इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2017 12:33 IST

डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांना सिरसामधल्या मुख्यालयामध्ये शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकांच्या मनात हा प्रश्न घोळत असून भारतीय सैन्यानं या संदर्भात 2010 मध्येच इशारा दिला होता, अशी माहिती समोर येत आहे. 

ठळक मुद्देडेरामध्ये ज्यावेळी पोलीसांनी धाडी टाकल्या त्यावेळी त्यांना तिथं शस्त्रास्त्रं आढळली नाहीत.मात्र, पंचकुला येथे उसळलेल्या हिंसाचारादरम्यान डेराच्या भक्तांच्या हातात रायफल, पिस्तुलं आदी शस्त्रं आढळली आहेत.

चंदीगढ, दि. 28 - डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांना सिरसामधल्या मुख्यालयामध्ये शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं का हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेकांच्या मनात हा प्रश्न घोळत असून भारतीय सैन्यानं या संदर्भात 2010 मध्येच इशारा दिला होता, अशी माहिती समोर येत आहे. एखाद्या माजी सैनिकाची मदत बाबा राम रहीमच्या अनुयायांना शस्त्रास्त्र चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी घेण्यात आली असावी असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. असं प्रशिक्षण घेतलेल्या सैनिक अनुयायांनी डेरापासून जरा लांबच रहावं असा सल्लाही देण्यात आला असावा, ज्यामुळे ते कुणाच्या नजरेत येणार नाहीत. कारण, डेरामध्ये ज्यावेळी पोलीसांनी धाडी टाकल्या त्यावेळी त्यांना तिथं शस्त्रास्त्रं आढळली नाहीत. मात्र, पंचकुला येथे उसळलेल्या हिंसाचारादरम्यान डेराच्या भक्तांच्या हातात रायफल, पिस्तुलं आदी शस्त्रं आढळली आहेत.भक्तांना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देण्यात आलं असावं असा एक प्रकार वादग्रस्त बाबा रामपाल याच्या प्रकरणी 2014 मध्ये उघडकीस आला होता. ज्यावेळी हिस्सारमध्ये सतलोक आश्रमात रामपालला अटक करण्यासाठी पोलीस गेले त्यावेळी पोलीसांवर हल्ला करून त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी एकूण सहा जणांना प्राण गमवावे लागले होते. सतलोक आश्रमात शस्त्रास्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात येतं का यावरून हरयाणा उच्च न्यायालयाने पुढाकार घेत स्यू मोटो कारवाई केली आणि 4 डिसेंबर 2014 रोजी हरयाणा सरकारला तशी नोटीस बजावली. आताही, न्यायाधीश एम. जयपाल यांनी डेराच्या कार्यकर्त्यांवर कडक नजर ठेवावी आणि हा प्रश्न चिघळणार नाही याची काळजी घ्यावी असं निरीक्षण नोंदवलं आहे. रामपालच्या घटनेची तुलना केली तर त्यापेक्षा आता हिंसाचारातील बळींची संख्या जास्त असेल असंही न्यायाधीशांनी नमूद केलं होतं. अर्थात, 2015मध्ये डेराला क्लीन चीट देताना, हरयाणा सरकारनं चौकशी केली असता डेरामध्ये शस्त्रास्त्रं आढळली नसल्याचं नमूद केलं. हरयाणाचे महाधिवक्ता किंवा अॅडव्होकेट जनरल बलदेव राज महाजन यांनीही डेरामध्ये त्यावेळी आक्षेपार्ह काही आढळलं नसल्याचं म्हटलं आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाHigh Courtउच्च न्यायालयRapeबलात्कारCrimeगुन्हा