शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, अनेक जखमी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 20:16 IST

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली.

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. जिल्ह्यातील मेंढर भागात लष्कराचे वाहन रस्ता चुकून दरीत कोसळले. या घटनेत अनेक जवान जखमी झाले. माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले अन् जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान 5 जवानांची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनात 8 ते 10 जवान होते, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. नीलम मुख्यालयाकडून बलनोई घोरा पोस्टकडे जाणारे 11 एमएलआयच्या लष्करी वाहनाचा घोरा पोस्टजवळ अपघात झाला. वाहन सुमारे 300-350 फूट खोल दरीत कोसळले. माहिती मिळताच 11 एमएलआयची क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले.

भारतीय लष्कराच्या व्हाईट नाईट कॉर्प्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मृत जवानांबद्दल शोक व्यक्त केला. "पुंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना वाहन अपघातात पाच शूर सैनिकांच्या दुःखद मृत्यूबद्दल #WhiteKnightCorps आम्ही शोक व्यक्त करतो. जखमी जवानांना वैद्यकीय सेवा दिली जात आहे," असे या पोस्टमध्ये म्हटले.

गेल्या महिन्यातही अपघात झालागेल्या महिन्यात अशाच एका अपघातात जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात लष्कराचा एक जवान शहीद झाला होता, तर दुसरा जखमी झाला होता. 4 नोव्हेंबर रोजी कालाकोटच्या बडोग गावाजवळ हा अपघात झाला, ज्यामध्ये नाईक बद्री लाल आणि हवालदार जय प्रकाश गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान लाल यांचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानAccidentअपघात