लष्करचा अतिरेकी सुभानला दिल्लीत अटक
By Admin | Updated: July 30, 2014 01:39 IST2014-07-30T01:39:00+5:302014-07-30T01:39:00+5:30
लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी अब्दुल सुभान याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2क् जुलै रोजी अटक केली

लष्करचा अतिरेकी सुभानला दिल्लीत अटक
नवी दिल्ली : लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी अब्दुल सुभान याला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने 2क् जुलै रोजी अटक केली असून,बडय़ा उद्योगपतींचे अपहरण करून त्यांच्याकडून मोठी खंडणी उकळण्याचा डाव हाणून पाडला आहे.
सुभान हा त्याचा चुलत भाऊ असाबुद्दीन ऊर्फ शौकत आणि अन्य काही अतिरेक्यांच्या सातत्याने संपर्कात होता. असाबुद्दीन हा कोलकात्यातील खादीम शू चे मालक पार्थ राय बर्मन यांच्या 2क्क्1 मधील अपहरण प्रकरणात सहभागी असून, तो सध्या प. बंगालच्या अलिपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सुभानला अटक केल्याने लष्कर-ए- तोयबाच्या अतिरेकी गटाचा अपहरण आणि खंडणी वसुलीद्वारे दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरविण्याचा डाव उधळला गेला असल्याचा दावा दिल्ली विशेष पोलीस शाखेचे विशेष आयुक्त एन.एन. श्रीवास्तव यांनी केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पाकी अतिरेक्यांच्या संपर्कात.़
गुजरातच्या पाटण येथे 2क्क्1 मध्ये शस्त्रसाठा ठेवण्यात असाबुद्दीनचा सहभाग होता. कथित अपहरणाच्या कटाबाबत पोलिसांनी त्याला दिल्लीत आणले असता सुभानबाबत माहिती मिळाली. सुभान हा हरयाणाच्या मेवात जिलतील असून, त्याला दिल्लीच्या विशेष शाखेने 2क् जुलै रोजी अटक केली. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये पळून गेल्यापासून तो पोलिसांच्या रडारवर होता. असाबुद्दीन, सुभान आणि लष्करच्या पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे अनेक फोन कॉल खंडित करून ऐकण्यात आले होते. असाबुद्दीन हा पाकिस्तानमधील अतिरेक्यांकडून मिळालेले आदेश सुभानकडे पोहोचवत होता.
लाल किल्लाही होते लक्ष्य
लाल किल्ला आणि अन्य स्मारके सुभानचे लक्ष्य होते, अशी माहिती एका वरिष्ठ अधिका:याने दिली. 2क्13 मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातही तो हल्ला घडविण्याच्या तयारीत हेाता. मोहम्मद शाहीद आणि कारी रशीद या दोघांना अटक झाल्यामुळे त्यांना हा कट सोडावा लागला होता. राजस्थान, हरयाणा आणि बिहारमधील युवकांची लष्करमध्ये भरती करण्यासाठी तो सक्रिय बनला होता.