शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

CDS बिपिन रावत यांच्या नावे बनावट पत्र होतेय व्हायरल; लष्कर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 16:54 IST

'माझी भारताच्या पहिल्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदी नियुक्ती करण्यात आली आहे.'

नवी दिल्ली : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या नावाने एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नौदल, वायुदल यांच्या तुलनेत भूदलाने शानदार कामगिरी केल्याचा या पत्रात दावा करण्यात आला आहे. 

"माझी भारताच्या पहिल्या ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. वायुदल आणि नौदल हे भूदलाच्या धर्तीवर काम करतील आणि चांगला कामगिरी करतील", असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय लष्कराच्या जनसंपर्क युनिट ADGPIने हे पत्र बनावट असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात ADGPIने ट्विटरवरून माहिती दिली आहे. 'काही लोक सोशल मीडियावर बनावट पत्र व्हायरल करून चुकीची माहिती पसरवत आहेत. यापासून सावधानता बाळगा', असे ट्विट ADGPIने केले आहे. 

याशिवाय, भारत सरकारच्या सूचना व प्रसारण कार्यालयाने (PIB) एका फॅक्ट चेकमध्ये सांगितले आहे की, 'जनरल बिपिन रावत यांच्या नावे एक कथित पत्र सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. असे कोणतेही पत्र जनरल बिपिन रावत यांनी लिहिलेले नाही. हे पत्र बनावट आहे.

 जनरल रावत पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’जनरल बिपिन रावत यांची गेल्या सोमवारी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदी नियुक्ती करण्यात आली. केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या कार्यकालामध्ये तीन वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. त्यामुळे आता या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचा कार्यकाळ हा 62 ऐवजी 65 वर्षे एवढा असणार आहे. दरम्यान, लष्करप्रमुखपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्या मंगळवारी बिपीन रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’पदाचा त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरपासून सुरू झाला असून, ते पुढील सूचना आणि मुदतवाढ मिळेपर्यंत या पदावर राहतील. 

समन्वय आखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी आणि तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वय आखण्यासाठी ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’हे पद निर्माण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा, यासाठी असा प्रकारचे पद निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती. ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’सैनिकी मोहिमेदरम्यान तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचे काम करेल.   

महाराष्ट्राचे पुत्र मनोज नरवणे यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया