लष्कराने बर्फामध्ये अडकलेल्या ७३ नागरीकांची सुटका केली

By Admin | Updated: March 13, 2016 17:52 IST2016-03-13T17:52:30+5:302016-03-13T17:52:30+5:30

भारतीय लष्कराने शनिवारी बर्फाखाली अडकलेल्या ७३ नागरीकांची सुटका केली.

The Army released the 73 people trapped in the ice | लष्कराने बर्फामध्ये अडकलेल्या ७३ नागरीकांची सुटका केली

लष्कराने बर्फामध्ये अडकलेल्या ७३ नागरीकांची सुटका केली

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - भारतीय लष्कराने शनिवारी बर्फाखाली अडकलेल्या ७३ नागरीकांची सुटका केली. कुपवाडा जिल्ह्यातील तांगधार नास्टा रोडवर बर्फाच्या ढिगा-याखाली अडकलेला ह्दयविकाराचा रुग्ण, महिला आणि मुलांची सुटका केली. 
राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी अडकलेल्या नागरीकांची सुटका करुन त्यांना वैद्यकीय मदत उपलबद्ध करुन दिली. नासला चुहून पासपासून दीडकि.मी. अंतरावर प्रवासी गाडया अडकल्याची राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना माहिती मिळाली. 
या गाडयामध्ये महिला, मुले, वृद्ध होते तसेच एका रुग्णवाहिकेत ह्दयविकाराचा रुग्णही होता. लष्कराच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून अडकलेल्या नागरीकांची सुटका केली. 

Web Title: The Army released the 73 people trapped in the ice