काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, 2 जवान जखमी

By Admin | Updated: April 1, 2017 17:09 IST2017-04-01T16:55:12+5:302017-04-01T17:09:36+5:30

पारीमपोरा-पंथाचौक बायपास रोडवर शनिवारी दुपारी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान जखमी झाले.

Army personnel attacked in Kashmir, two jawans injured | काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, 2 जवान जखमी

काश्मीरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, 2 जवान जखमी

 ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. 1 - पारीमपोरा-पंथाचौक बायपास रोडवर शनिवारी दुपारी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान जखमी झाले. सव्वा एकच्या सुमारास एसकेआयएमएस रुग्णालयाजवळून जाणा-या लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यानंतर काही समाजकंटकांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांवर दगडफेक केली. 
 
ताफ्यातील शेवटच्या गाडीतील दोन जवान जखमी झाले. पारीमपोरा येथून पंथाचौकच्या दिशेने ताफा चाललेला असताना हा हल्ला झाला. गोळीबाराला प्रत्युत्तर मिळताच दहशतवादी तिथून पसार झाले अशी माहिती अधिका-याने दिली. परिसराला घेराव घालून शोधमोहिम सुरु झाली आहे. 
 

Web Title: Army personnel attacked in Kashmir, two jawans injured