लष्करी अधिका:याला अटक

By Admin | Updated: August 9, 2014 01:21 IST2014-08-09T01:21:19+5:302014-08-09T01:21:19+5:30

भारतीय लष्करासंबंधीची गोपनीय माहिती पैसे घेऊन तिला दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गुरुवारी भारतीय लष्करातील एका कनिष्ठ अधिका:यास अटक केली.

Army officer: arrested | लष्करी अधिका:याला अटक

लष्करी अधिका:याला अटक

>हैदराबाद : एका महिला पाकिस्तानी हेराने सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलेल्या जाळ्य़ात फसून भारतीय लष्करासंबंधीची गोपनीय माहिती पैसे घेऊन तिला दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गुरुवारी भारतीय लष्करातील एका कनिष्ठ अधिका:यास अटक केली. लष्करात नायब सुभेदार या हुद्दय़ावर असलेल्या पतन कुमार पोद्दारला सिकंदराबाद रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली.  नंतर त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली. पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली असून त्यावर शुक्रवारी युक्तिवाद होईल.
मुळचा पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील मंगलबारी येथील रहिवासी असलेला पोद्दार ऑगस्ट 1996 मध्ये लष्करात कारकून म्हणून रुजू झाला होता. पाकिस्तानी हेर असल्याचा संशय असलेल्या अनुष्का अगरवाल नामक महिलेने पोद्दारला फेसबूकवरून प्रेमाच्या जाळ्य़ात ओढून त्याच्याकडून भारतीय लष्कराच्या विविध तुकडय़ांच्या तैनाविषयी तसेच तोफखाना दलाच्या ठिकाणांविषयी माहिती काढून घेतली, असा आरोप पोलिसांनी रिमांड अर्जात केला आहे.
आपले वडील भारतीय हवाई दलाचे निवृत्त अधिकारी आहेत व त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील झाशी शहरात आपण एक एनजीओ चालवितो, असे अनुष्काने फेसबूक पोस्टव्दारे पोद्दारला सांगितले. कालांतराने प्रेमाची गळ घालून तिने तिच्या कथित एनजीओसाठी केल्या जाणा:या ऑनलाईन सव्रेक्षणात सहभागी होण्यास सांगून त्याबद्दल पोद्दारला पैसे देऊ केले. गेल्या वर्षभरात तिने पोद्दारच्या बँक खत्यात 78 हजार रुपये जमा केले व लंडन भेटीचे आमिष दाखविले. याबदल्यात तिने सव्रेक्षणाच्या नावाखाली पोद्दारकडून भारतीय लष्कराविषयीची गोपनीय माहिती काढून घेतली, असे पोलिसांचे म्हणणो आहे. (वृत्तसंस्था)
 
4प्रत्यक्षात फेसबूकर अनुष्का अगरवाल अशी स्वत:ची ओळख सांगणारी व्यक्ती अस्तित्वात नसून पाकिस्तानी महिला हेराने भारतीय लष्करी अधिका:यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जाळ्य़ात ओढण्यासाठी केलेली ती तोतयेगिरी आहे, असे गुप्तहेर संघटनांनी केलेल्या तपासातून उघड झाले आहे. तिने सुरुवातीस आपली नग्न छायाचित्रे फेसबूकच्या माध्यमातून पोद्दारला पोस्ट करून त्याला जाळ्य़ात फसविले. प्रत्यक्षात ती छायाचित्रे त्या पाकिस्तानी महिला हेराची नव्हती तर तिच्या ‘हॅण्डलर’ची होती. पोद्दारशी संपर्क साधताना ‘प्रॉक्झी’चा वापर केल्याने या ‘हॅण्डलर’चा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. पोद्दारकडून पोलिसांनी तीन मोबाईल फोन, 1क् सिमकार्ड. तीन डेटाकार्ड, एक पेनड्राईव्ह, ेक कार्ड रीडर व दोन संगणक हस्तगत केले  आहेत.

Web Title: Army officer: arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.