लष्कराने मोस्ट-वॉण्टेड 12 दहशतवाद्यांची यादी केली जाहीर

By Admin | Updated: June 1, 2017 16:04 IST2017-06-01T16:04:43+5:302017-06-01T16:04:43+5:30

भारतीय लष्कराने काश्मीर खो-यात सक्रीय असलेल्या 12 दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे

The Army lists the list of the most wanted terrorists | लष्कराने मोस्ट-वॉण्टेड 12 दहशतवाद्यांची यादी केली जाहीर

लष्कराने मोस्ट-वॉण्टेड 12 दहशतवाद्यांची यादी केली जाहीर

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - भारतीय लष्कराने काश्मीर खो-यात सक्रीय असलेल्या 12 दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद भट्ट ठार झाल्याच्या काही दिवसानंतर लगेचच ही यादी जाहीर करण्यात आली आहे. काश्मीरमधील त्राल येथे लष्करासोबत झालेल्या चकमकीत सबजार अहमद ठार झाला होता. 
 
या यादीत काही महत्वाची नावे समाविष्ट असून लष्कर-ए-तोयबाचा अबु दुजाना, हिजबूल मुजाहिद्दीनचा रियाज उर्फ जुबैर आणि झकीर राशीद भट उर्फ झकीर मुसा यांचा समावेश आहे. सबजार अहमद ठार झाल्यानंतर रियाज उर्फ जुबैरला हिजबूल मुजाहिद्दीनचा कमांडर म्हणून निवडतील अशी शक्यता आहे. बुरहान वानीला ठार करण्यात आल्यानंतर सबजार अहमदने त्याची जागा घेतली होती. मात्र आता तोदेखील ठार झाला असल्याने जागा रिक्त आहे. 
 
बुरहान वानीप्रमाणे रियाज उर्फ जुबैरदेखील सोशल मीडियावर सक्रिय असतो. हिजबूलच्या दहशतवाद्यांपैकी रियाजची भूमिका मवाळ असल्याची माहिती आहे. तसंच काश्मीर खो-यात निर्धर्मी चळवळीला त्याचा पाठिंबा आहे. 
 
झकीर राशीद भट उर्फ झकीर मुसाने एक व्हिडीओ जारी केल होता ज्यामध्ये त्याने काश्मीर खो-यात शरिया लागू करण्यात अडथळा आणणा-या फुटीरतावादी नेत्यांचं मुंडकं छाटण्याची धमकी दिली होती. हिजबूलसोबत वैचारिक मतभेद झाल्यानंतर झकीर राशीद भट उर्फ झकीर मुसाने वेगळा मार्ग निवडला होता. 
 

Web Title: The Army lists the list of the most wanted terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.