शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये तैनात जवानाच्या मृत्यूनंतर पत्नीचा गळफास; लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 12:42 IST

कोतवाली देहात गावात बिजोरी रहिवासी जवान अरविंद चौहान लष्कारात नोकरी करत होता.

ठळक मुद्देपतीच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी पत्नी आरतीनेही गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केलीअंत्यसंस्कारावेळी आरती पती अरविंदचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी पोहचली होतीअरविंद चौहान पाच वर्षापूर्वी लष्करात शिपाई पदावर भरती झाला होता.

एटा - उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात सैनिक पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचाही जीव गेला आहे. माहेरी असणाऱ्या पत्नीचा मृतदेह गुरुवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

कोतवाली देहात गावात बिजोरी रहिवासी जवान अरविंद चौहान लष्कारात नोकरी करत होता. काश्मीरमध्ये अरविंद तैनात होता. ६ ऑगस्टला लष्कराच्या शिबिरात त्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. अरविंद आणि पत्नी आरती यांच्यात काहीतरी बिनसलं होतं. त्यामुळेच पत्नीने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

सहा दिवसांनी पत्नीचाही जीव गेलापतीच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी पत्नी आरतीनेही गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद आणि आरतीचं लग्न २९ जानेवारी २०१९ रोजी झालं होतं. मागील काही महिन्यापासून दोघांमध्ये वादविवाद सुरू होते. त्यामुळे आरतीनं माहेरी राहण्याचा निर्णय घेतला. अरविंद चौहानचा मृतदेह १० ऑगस्टला काश्मीरहून एटाला आणला होता. याठिकाणी बिजोरी गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी आरती पती अरविंदचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी पोहचली होती. परंतु अरविंदच्या कुटुंबाने आरतीला त्यांचा मृतदेह पाहायलाही दिला नाही. त्यामुळे आरती खूप दु:खी होती. अरविंद चौहान पाच वर्षापूर्वी लष्करात शिपाई पदावर भरती झाला होता. त्यांचा मोठा भाऊही सैन्यात आहे. ते सध्या अहमदनगर येथे तैनात आहेत. वडील अरुण चौहान लष्करातून सेवानिवृत्त झाले आहेत. घरगुती वादातून एका आठवड्यात पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.  

अरविंद चौहानच्या मृत्यूच कारण अस्पष्टशुक्रवारी राजौरी क्षेत्रात चकमक सुरु असताना लष्कराकडून अरविंदच्या घरच्यांना फोन आला की अरविंदचा मृत्यू झाला आहे. चकमकीत अरविंद शहीद झाला असं त्याच्या कुटुंबियांना वाटलं. परंतु लष्कराने चकमकीचा कोणताही उल्लेख केला नाही. सोमवारपर्यंत लष्कराकडून अरविंदच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट होतं असं त्याचे वडील म्हणाले. माझा मुलगा खूप शौर्यवान होता. देशाच्या सेवेसोबत त्याच्या मनात शिक्षणाचीही आवड होती. एकेदिवशी त्याने मला काही डॉक्यूमेंट्स मागितले होते. त्याला बीएससी पदवी घ्यायची होती. लष्करात भरती झाल्यानंतर बीएससीच्या दुसऱ्या वर्षापासून त्याचे शिक्षण बंद झाले असं अरुण चौहान यांनी सांगितले. 

टॅग्स :Policeपोलिस