श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या नौबाग कुंड (जिल्हा कुलगाम) येथे मंगळवारी सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा जवान शहीद तर अतिरेकी ठार झाला. पुलवामा जिल्ह्यात सुरक्षादले अतिरेक्यांविरोधात कारवाई करीत असताना ही चकमक उडाली. नौबाग कुंड येथे अतिरेक्यांशी लढताना जवान गंभीररित्या जखमी झाला व नंतर त्याचा मृत्यू झाला, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. पोलिस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार नौबाग कुंड खेड्यात सुरक्षादलांनी मंगळवारी सकाळी घेराव घालून शोध सुरू केला होता. या भागात अतिरेकी असल्याची निश्चित माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई झाली. सुरक्षादले शोध घेत असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला व त्यातून चकमक उडाली. दुसरी चकमक पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात लाम खेड्यात सुरक्षादले शोध घेत असताना त्यांच्यावर अतिरेक्यांनी गोळीबार सुरू करताच उडाली. अतिरेक्यांचे लपण्याचे ठिकाण उघडकीस आणण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाºयाने सांगितले.
अतिरेक्यांशी चकमकीत लष्कराचा जवान शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 22:55 IST
जम्मू आणि काश्मीरच्या नौबाग कुंड (जिल्हा कुलगाम) येथे मंगळवारी सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा जवान शहीद तर अतिरेकी ठार झाला.
अतिरेक्यांशी चकमकीत लष्कराचा जवान शहीद
ठळक मुद्दे सुरक्षादले शोध घेत असताना अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला व त्यातून चकमक उडाली.