सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी हेराला अटक, सापडले लष्कराच्या तैनातीचे नकाशे
By Admin | Updated: October 22, 2016 10:59 IST2016-10-22T08:22:55+5:302016-10-22T10:59:34+5:30
जम्मू-काश्मिरच्या सांबा सेक्टरमध्ये शनिवारी सकाळी एका पाकिस्तानी हेराला अटक करण्यात आली.पाकिस्तानचे नापाक इरादे जाणून घेण्यासाठी त्याची कसून चौकशी सुरु आहे.

सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी हेराला अटक, सापडले लष्कराच्या तैनातीचे नकाशे
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २२ - जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये शनिवारी सकाळी एका पाकिस्तानी हेराला अटक करण्यात आली. दोन सीमकार्ड आणि सुरक्षा दलाच्या तैनातीची माहिती देणारे नकाशे त्याच्याकडून जप्त करण्यात आले. बोधराज असे या हेराचे नाव असून तो जम्मूच्या अर्णिया सेक्टरमध्ये रहात होता.
पाकिस्तानचे नापाक इरादे जाणून घेण्यासाठी त्याची कसून चौकशी सुरु आहे. कथुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये बीएसएफच्या कारवाईत शुक्रवारी सात पाकिस्तानी रेंजर्स ठार झाल्यानंतर ही अटक झाली आहे. सप्टेंबर महिन्यात उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे १९ जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार केले.
आणखी वाचा
त्यानंतर पाकिस्तानकडून मोठया प्रमाणावर शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात राजस्थानमध्ये एका पाकिस्तानी हेराला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे सीमा भागाचे नकाशे आणि छायाचित्रे सापडली होती.