लष्करी हेलिकॉप्टर कोसळून १७ ठार

By Admin | Updated: August 6, 2015 22:43 IST2015-08-06T22:43:33+5:302015-08-06T22:43:33+5:30

अफगाणिस्तानच्या झाबूल प्रांतात गुरुवारी लष्करी हेलिकॉप्टर कोसळून १२ सैनिकांसह १७ जण ठार झाले. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Army helicopter collapses 17 killed | लष्करी हेलिकॉप्टर कोसळून १७ ठार

लष्करी हेलिकॉप्टर कोसळून १७ ठार

कंदहार : अफगाणिस्तानच्या झाबूल प्रांतात गुरुवारी लष्करी हेलिकॉप्टर कोसळून १२ सैनिकांसह १७ जण ठार झाले. तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लष्करी हेलिकॉप्टर शिनके जिल्ह्यात कोसळले. या जिल्ह्यात अतिरेकी कारवाया तुलनेने नगण्य आहेत. मृतांत १२ सैनिक व ५ उड्डयन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले. जिल्हाप्रमुख मोहंमद कासीम खान यांनी मृतांच्या संख्येला दुजोरा देताना अपघाताच्या चौकशीसाठी एक पथक घटनास्थळी पाठविण्यात आल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Army helicopter collapses 17 killed