काश्मिरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले दोन वैमानिकांचा मृत्यू

By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:47+5:302015-02-11T23:19:47+5:30

श्रीनगर - मध्य काश्मीरच्या बांदीपोरा जिल्‘ात बुधवारी सायंकाळी लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात दोन वैमानिक ठार झाले.

Army helicopter collapse kills two pilots dead | काश्मिरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले दोन वैमानिकांचा मृत्यू

काश्मिरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले दोन वैमानिकांचा मृत्यू

रीनगर - मध्य काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी लष्कराचे एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात दोन वैमानिक ठार झाले.
लष्कराच्या प्रवक्त्याने या अपघाताची माहिती देताना सांगितले की, लष्कराच्या उड्डाण बेड्यातील ध्रुव हेलिकॉप्टरने सायंकाळी मानसबल तळावरून उड्डाण घेतल्यानंतर ३० मिनिटातच सफापोरा भागातील पहाडांवर ते कोसळले. यात एक लेफ्टनंट कर्नल आणि मेजर मृत्युमुखी पडले. संरक्षण विभागातील सूत्रांच्या सांगण्यानुसार सायंकाळी ७.४३ वाजता हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला होता. हे हेलिकॉप्टर रात्रीच्या प्रशिक्षण उड्डाणावर होते. (वृत्तसंस्था)



Web Title: Army helicopter collapse kills two pilots dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.