लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात
By Admin | Updated: October 2, 2014 00:58 IST2014-10-02T00:58:17+5:302014-10-02T00:58:17+5:30
उत्तर प्रदेशच्या बरेली येथील हवाईतळावरून आकाशात ङोपावलेले लष्कराचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन तीनजण ठार झाले. मृतांत दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे.

लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात
बरेली : उत्तर प्रदेशच्या बरेली येथील हवाईतळावरून आकाशात ङोपावलेले लष्कराचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त होऊन तीनजण ठार झाले. मृतांत दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा समावेश आहे.
लष्कराच्या अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना बुधवारी सकाळी घडली. या हेलिकॉप्टरने आपल्या नियमित सरावाकरिता हे उड्डाण केले होते. उड्डाण करताच त्यात काहीतरी बिघाड झाला व त्याला आग लागून ते हवाईतळावर कोसळल्याचे हा अपघात पाहणा:यांनी सांगितले. यात वैमानिक मेजर अभिजित थापा (29), कॅप्टन अविनाश यशवंत पाटील सोमवंशी (26) व फ्लाईट इंजिनिअर मेजर विकास बरयाणी (29), हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला. लष्कराने या दुर्घटनेची चौकशी सुरू केली असल्याचे सूत्रंनी सांगितले. अपघातामागील कारण चौकशीनंतरच समोर येईल, असेही लष्करी अधिका:याने सांगितले. (वृत्तसंस्था)
4हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अधिका:यांमध्ये मराठवाडय़ाचे भूमिपूत्र कॅप्टन अविनाश यशवंत पाटील-सोमवंशी यांचा समावेश आहे.
4बोरगाव तुपाचे (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील शेतकरी कुटुंबातील अविनाश पाटील 2क्11 पासून हवाईदलात कॅप्टनपदी कार्यरत होत़े एमबीएची पदवी मिळविलेल्या अविनाश यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवित हवाईदलात स्थान मिळविले होते.
4त्यांचा विवाह मे 2क्14 मध्ये झाला होता़ बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात ते मृत्युमुखी पडले. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.