आर्मीने यापूर्वी सुद्धा LOC ओलांडली पण दहशतवादी तळ पहिल्यांदाच केले उद्धवस्त
By Admin | Updated: October 19, 2016 08:02 IST2016-10-19T07:56:14+5:302016-10-19T08:02:07+5:30
सर्जिकल स्ट्राईक्स कोणाच्या कार्यकाळात कसे झाले यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे.

आर्मीने यापूर्वी सुद्धा LOC ओलांडली पण दहशतवादी तळ पहिल्यांदाच केले उद्धवस्त
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - सर्जिकल स्ट्राईक्स कोणाच्या कार्यकाळात कसे झाले यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे. यापार्श्वभूमीवर सरकारने मंगळवारी संसदीय समितीच्या सदस्यांना माहिती देताना यापूर्वी सुद्धा लष्कराने नियंत्रण रेषा पार करुन कारवाई केल्याचे मान्य केले.
पण २९ सप्टेंबरचे सर्जिकल स्ट्राईक्स पूर्वीच्या कारवाईपेक्षा पूर्णपणे भिन्न होते असे सरकारच्यावतीने परराष्ट्र सचिव एस.जयशंकर यांनी सांगितले. काँग्रेस खासदार सत्यव्रत चर्तेुवेदी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
परराष्ट्र विषयावरील संसदेच्या स्थायी समितीला मंगळवारी सर्जिकल स्ट्राईक्सची माहिती देण्यात आली. लष्कराने यापूर्वी नियंत्रण रेषा पार केली होती का ? तर त्याचे उत्तर 'हो' आहे पण लाँच पॅड म्हणजे दहशतवादी तळ नष्ट केले होते का ? तर त्याचे उत्तर नाही असल्याचे परराष्ट्रसचिवांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.