शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात घुसले लष्कर, रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 12:18 IST

पंजाब-हरयाणामध्ये कालच्या सारखी परिस्थिती उदभवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हरयाणामध्ये लष्काराने पाचारण केले आहे. 

पंचकुला, दि. 26 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला साध्वीवरील बलात्कार प्रकरणात सीबीआयने कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर हरयाणा-पंजाबमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला होता. आज अशी परिस्थिती उदभवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हरयाणामध्ये लष्काराने पाचारण केले आहे.  - हरयाणातील सिरसा येथी डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात लष्कर आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान घुसले आहेत. 

- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकीत पंजाब-हरयाणातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित आहेत. 

- काल झालेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला तर, 250 हून अधिक जखमी झाले होते. - हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील सुनारीया येथील तुरुंगात गुरमीत राम रहीमला ठेवण्यात आले आहे. सामान्य कैद्यासारखीच त्याला वागणूक दिली जात आहे. 

- सिरसामधील आश्रमात हजारो डेरा समर्थक आहेत. - पंजाब, हरयाणामधील अऩेक भागात जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. 

- पंजाबच्या मानसामध्ये लष्कराने फ्लॅग मार्च केला. 

- कायदा-सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान पंजाब-हरयाणाला जाणा-या 309 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. 

 हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले आहे. गुरमीत राम रहीम यांच्या अटकेनंतर हरयाणामध्ये झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना दिल्लीतून बोलावणे आले आहे. खट्टर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले जाऊ शकते. रिपब्लिक वाहिनीने हे वृत्त दिले आहे.  एकूणच खट्टर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला धोका निर्माण झाला आहे. हरयाणात पंचकुला आणि अन्य भागात शुक्रवारी जो हिंसाचार झाला त्यामध्ये 30 लोकांचा मृत्यू झाला तर, 250 पेक्षा जास्त जखमी झाले. 

प्रसारमाध्यमांनी हरयाणामधील या परिस्थितीसाठी मनोहर लाल खट्टर यांना जबाबदार धरले आहे. राज्य सरकारच्या निष्क्रीयतेमुळे ही परिस्थिती उदभवल्याचा आरोप प्रसारमाध्यमांनी केला आहे. मनोहर लाल खट्टर यांनी 26 ऑक्टोंबर 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनवर्षात तीनवेळा हरयाणात अशा प्रकारचा हिंसाचार झाला आहे. 

2014 मध्ये रामपाल नावाच्या बाबाला अटक करताना झालेल्या हिंसाचारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जाट आंदोलनाच्यावेळी 30 जणांना प्राण गमावावे लागले होते. आता गुरमीत राम रहीमच्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला. एकूणच महत्वाच्या प्रसंगी कायदा-सुव्यवस्था राखण्यात मनोहर लाल खट्टर सरकार अपयशी ठरले आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हा