शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लष्करप्रमुख नरवणे तीन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2020 07:18 IST

Army Chief Narwane News : दोनही देशात सुमारे  १,८०० किलोमीटर लांबीची सीमा असून, त्याचे व्यवस्थापन, सहकार्य  यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर व्यापक चर्चा करणार आहेत.

नवी दिल्ली -  लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे नेपाळशी असलेले संबंध आणखी मजबूत करण्यासाठी ३ नोव्हेंबरपासून या हिमालयीन देशाच्या तीन दिवसीय  दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते  नेपाळी समपदस्थ जनरल पूर्णचंद्र थापा यांच्यासमवेत नेपाळचे ज्येष्ठ लष्करीआणि इतर अधिकाऱयांसमवेत चर्चा  करणार आहेत. दोनही देशात सुमारे  १,८०० किलोमीटर लांबीची सीमा असून, त्याचे व्यवस्थापन, सहकार्य  यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर व्यापक चर्चा करणार आहेत. मागील मे महिन्यात नेपाळने एक वादग्रस्त नकाशा जारी करून भारताचा काही भाग त्या देशात  दाखवले होते. तेव्हापासून दोन्हीदेशात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर  दोहोंतील हा पहिला उच्चस्तरीय दौरा असेल.  उच्चपदस्थ सरकारी सूत्रांनी सांगितले की, लष्करप्रमुख नरवणे हे  दोन्ही देशातील संरक्षण  आणि संरक्षणाच्या क्षेत्रातील संबंध आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने चार  ते सहा नोव्हेंबर या कालावधीत नेपाळचा  दौरा करणार आहेत.वर्ष १९५०मध्ये सुरू झालेली परपरा कायम ठेवत काठमांडूमधील एका कार्यक्रमात नेपाळचे राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी ह्या जनरल नरवणे यांना  नेपाळी सेनेच्या जनरलच्या  मानद रँकने सन्मानित करणार आहेत. भारतही नेपाळच्या सनाेप्रमुखाना भारतीय  सेनेचे जनरल हा मानद रँक देत आलेला आहे. चीन  या क्षेत्रात आपली ताकद वाढवत असताना भारत आपल्या शेजारी देश म्यानमार, मालदीव, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान यांच्यासमवेतचे संबंध पुन्हा एकदा मजबूत करण्याच्या  प्रयत्नात आहे. याचाच एक भाग म्हणून महिन्याच्या सुरुवातीला जनरल नरवणेंनी विदेश सचिव हर्षवर्धन  शृंगला यांच्यासमवेत  म्यानमारचा दौरा केला होता.  समग्र रणनीतिक हितांसंदर्भात नेपाळ भारतासाठी महत्वपूर्ण आहे. दोन्ही देशात जुन्या काळापासून रोटी- बेटी व्यवहारही झालेले आहेत.

टॅग्स :manoj naravaneमनोज नरवणेIndian Armyभारतीय जवानIndiaभारतNepalनेपाळ