सेनेचा दणका
By Admin | Updated: October 20, 2014 05:07 IST2014-10-20T05:07:27+5:302014-10-20T05:07:27+5:30
कोकणातील राजकारण नव्या वळणावर आलेले होते. ते रविवारच्या निकालाने स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या राजकारणाला दुसरा दणका बसला

सेनेचा दणका
कोकणातील राजकारण नव्या वळणावर आलेले होते. ते रविवारच्या निकालाने स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या राजकारणाला दुसरा दणका बसला. लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र नीलेश राणे यांचा पराभव झाला आणि दस्तुरखुद्द त्यांचाच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे वैभव नाईक यांनी पराभव केला.
रत्नागिरीऐवजी दापोली आणि गुहागरची जागा राष्ट्रवादीने जिंकली. सावंतवाडीत दीपक केसरकर यांनी दणदणीत विजय मिळविला. दापोलीमध्ये शिवसेनेचे सूर्यकांत दळवी यांचा राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी केलेला पराभव, रत्नागिरीचे राष्ट्रवादीचे आमदार उदय सामंत शिवसेनेत जाऊनही त्यांचा झालेला विजय आणि नारायण राणेंचा पराभव होत असताना नितेश राणे यांचा झालेला विजय ही कोकणातील वैशिष्ट्येच आहेत.