जम्मू - काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
By Admin | Updated: November 16, 2016 21:07 IST2016-11-16T20:59:38+5:302016-11-16T21:07:48+5:30
जम्मू काश्मीरमध्ये बांदिपोरात जिल्ह्यात भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन ते तीन दहशतवादी लपले

जम्मू - काश्मीरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 16 - जम्मू - काश्मीरमध्ये बांदिपोरात जिल्ह्यात भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
जम्मू-काश्मीर येथील सोपोर परिसरात आज सकाळी दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक पोलीस अधिकारी शहीद झाले. यानंतर पोलिसांनी दहशताद्यांविरोधात ऑपरेशनला सुरुवात केली होती. बारामुल्लामधील मारबल गावातील झालूरा जंगलात दहशतवादी लपले असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र एकूण किती दहशतवादी आहेत, याची ठोस माहिती मिळू शकलेली नव्हती.
दरम्यान, भारतीय लष्कराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.
#flash Encounter between security forces and terrorists underway in Bandipora district (J&K); 2-3 terrorists believed to be hiding.
— ANI (@ANI_news) 16 November 2016